रेणापूर नगरपंचायत त्रिशंकू; भाजपा मोठा पक्ष

By Admin | Published: May 27, 2017 12:28 AM2017-05-27T00:28:38+5:302017-05-27T00:32:19+5:30

रेणापूर : रेणापूर नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा, काँग्रेस या दोन्ही पक्षांंना स्पष्ट बहुमत मिळाले नाही.

Renapur Nagar Panchayat Hung; BJP big party | रेणापूर नगरपंचायत त्रिशंकू; भाजपा मोठा पक्ष

रेणापूर नगरपंचायत त्रिशंकू; भाजपा मोठा पक्ष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रेणापूर : रेणापूर नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा, काँग्रेस या दोन्ही पक्षांंना स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे त्रिशंकू अशी अवस्था झाली आहे. भाजपाचे ८, काँग्रेस ६, राष्ट्रवादीचा १ उमेदवार विजयी झाला असून, दोन अपक्षांनी बाजी मारली आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
रेणापूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली आहे. १७ जागांसाठी ७३ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. अवघ्या दीड तासांत मतमोजणी पूर्ण झाली. दरम्यान, निकाल जाहीर होत असताना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली होती.
या निवडणुकीत प्रभाग १ मधून राष्ट्रवादीच्या शबियाबी शेख, प्रभाग २ मधून अपक्ष सुमन मोटेगावकर, प्रभाग ३ मधून भाजपाच्या जमुनाबाई राठोड, प्रभाग ४ मधून भाजपाच्या गोजरबाई आवळे, प्रभाग ५ मधून भाजपाचे दत्ता सरवदे, प्रभाग ६ मधून काँग्रेसचे अनिल पवार, प्रभाग ७ मधून काँग्रेसच्या शीला मोटेगावकर, प्रभाग ८ मधून काँग्रेसचे शिवाजी पाटील, प्रभाग ९ मधून भाजपाचे अभिषेक आकनगिरे, प्रभाग १० मधून काँग्रेसच्या रजियाबी शेख, प्रभाग ११ मधून काँग्रेस पुरस्कृत रामलिंग जोगदंड, प्रभाग १२ मधून काँग्रेसच्या कोमल राजे, प्रभाग १३ मधून अपक्ष गजेंद्र चव्हाण, प्रभाग १४ मधून भाजपाचे विजय चव्हाण, प्रभाग १५ मधून भाजपाच्या उज्ज्वल कांबळे, प्रभाग १६ मधून भाजपाच्या सुरेखा चव्हाण, प्रभाग १७ मधून भाजपाच्या आरती राठोड या विजयी झाल्या आहेत.

Web Title: Renapur Nagar Panchayat Hung; BJP big party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.