जालना बसस्थानकाचे नूतनीकरण कासवगतीने

By Admin | Published: May 16, 2017 12:42 AM2017-05-16T00:42:47+5:302017-05-16T00:44:36+5:30

जालना : जिल्हा ठिकाणच्या बसस्थानकाची दुरवस्था कायम आहे.

Renewal of Jalna bus station | जालना बसस्थानकाचे नूतनीकरण कासवगतीने

जालना बसस्थानकाचे नूतनीकरण कासवगतीने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा ठिकाणच्या बसस्थानकाची दुरवस्था कायम आहे. वर्षभरापूर्वी बसस्थानकाच्या सुशोभिकरणासाठी सुमारे एक कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र निधी मिळूनही कामाला गती नसल्याचे चित्र आहे.
जालना शहराचे मध्यवर्ती बसस्थानक असल्यामुळे वेगळी ओळख आहे. राज्यभरातून हजारो प्रवाशांची येथे वर्दळ असते. दीडशे बसेसच्या फेऱ्या येथे नियमित होतात. या बसस्थानकाचे सुशोभिकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने वर्षभरापूर्वी एक कोटींच निधी मंजूर केला. निधी मंजूर होताच स्थानकातील फलाटावरील फरशा तसेच प्लास्टर व रंग काढण्यात आला. काम गतीने होईल अशी प्रवाशांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात सहा महिने उलटले तरी कामांत कोणतीच प्रगती झालेली नाही. एक कोटींच्या निधीतून नवीन फरशा, रंगरंगोटी, प्रवाशांना बसण्यासाठी प्रशस्त आसन व्यवस्था, अंतर्गत वीज जोडणी, आकर्षक दिवे, पंखे, प्रवाशांना बसेसची माहिती होण्यासाठी डिस्प्ले तसेच अन्य सुविधा यातून करणयात येणार आहेत. दोन ते तीन महिन्यांपासून बसस्थानकाची दुरवस्था आहे. विभाग नियंत्रकांनी हे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारास देण्याची मागणी होत आहे.
बसस्थानकातील अंतर्गत रस्त्यांमुळे बस आली की धुळीचे लोळ उठतात. याचा त्रास प्रवाशांना होत आहे. रूग्ण तसेच दमा आदी आजार असलेल्यांना बसस्थानकात बसणे जिकिरीचे झाले आहे. बसस्थानकात खोदकाम केल्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना चालताना मोठी अडचण येत आहे.

Web Title: Renewal of Jalna bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.