साडेसात लाख शेतकऱ्यांना भरपाई
By Admin | Published: January 14, 2015 11:33 PM2015-01-14T23:33:05+5:302015-01-15T00:12:25+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून खरीप पिकांची नुकसान भरपाई आल्याने बळीराजा सुखावला आहे. यामध्ये साडेसात लाख शेतकऱ्यांना खरीपाचे अनुदान मिळणार आहे
व्यंकटेश वैष्णव , बीड
दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून खरीप पिकांची नुकसान भरपाई आल्याने बळीराजा सुखावला आहे. यामध्ये साडेसात लाख शेतकऱ्यांना खरीपाचे अनुदान मिळणार आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्य बँकेतून शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील खरीप पिके पावसा अभावी वाया गेले. यामुळे बळीराजा अर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दुष्काळात मदतीचा हात देण्याच्या दुष्टीकोणातून शासनाने खरीप पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील ७ लाख ८५ हजार ४७२ शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बीड जिल्ह्यात १४०४ गावे आहेत. या सर्व गावातील खरीपाच्या पिकांची पहाणी करण्यासाठी महिनाभरापूर्वी केंद्राचे एक पथक आले होते. यानुसार जिल्ह्यातील ७ लाख ८५ हजार ४७२ शेतकऱ्यांसाठी १४२ कोटी रूपयांचे अनुदान आले आहे. दोन हेक्टर पर्यंतच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांचे अनुदान जिल्हा बँकेतून वाटप होणार आहे. ११ तालुक्यातील संबंधीत तहसिलदारांच्या मार्फत ज्या-त्या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची अनुदान यादी ग्राम पंचायतीच्या सूचना फलकावर डकविण्याची प्रक्रीया सुरू आहे. अनुदान देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीवर ज्यांचा आक्षेप असेल त्यांनी तहसिलदार यांच्याकडे चार दिवसात तक्रार करण्यासाठी अवधी दिला आहे़
बीड जिल्हयात मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांवर आस्मानी संकटाची मालीका सुरू आहे. यामध्ये २०११-१२ मध्ये १८९ कोटी रूपयांचे लाल्याचे अनुदान शेतकऱ्यांना आले होते. याशिवाय २०१४ मध्ये फेबु्रवारी दरम्यान गारपीठ झाली होती. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी १०० कोटी रूपयांचा निधी आला होता.
जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.
४यात ६ लाख ५१ हजार २४१ शेतकरी अल्पभूधारक तर १ लाख ३४ हजार २३१ शेतकरी बहू भूधारक आहेत़
भरपाई अशी़़़़
बागायती९००० प्रति हेक्टर
जिरायती४५०० प्रति हेक्टर
फळपिक१२००० प्रति हेक्टर