जालन्याची संस्कृती करणार जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:45 AM2018-04-01T00:45:17+5:302018-04-01T00:45:51+5:30
इटलीतील वेरोना येथे १ ते ९ एप्रिलदरम्यान होणाऱ्या ज्युनिअर जागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी जालना येथील संस्कृती पडूळ ही भारताचे प्रतिनिधित्व करार आहे. जागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथे ८ मार्च रोजी निवड चाचणी झाली होती. या चाचणीत केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे तिची भारतीय संघात निवड झाली आहे.
औरंगाबाद : इटलीतील वेरोना येथे १ ते ९ एप्रिलदरम्यान होणाऱ्या ज्युनिअर जागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी जालना येथील संस्कृती पडूळ ही भारताचे प्रतिनिधित्व करार आहे. जागतिक तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथे ८ मार्च रोजी निवड चाचणी झाली होती. या चाचणीत केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे तिची भारतीय संघात निवड झाली आहे. संस्कृती जागतिक स्पर्धेत सेबर प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाला या ग्रामीण भागातील असणाºया संस्कृतीने याआधी २०१२ मध्ये थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच आतापर्यंत ७ राष्ट्रीय स्पर्धांत आपला ठसा उमटवणाºया संस्कृतीने २०१३ मध्ये नाशिक येथील राष्ट्रीय स्पर्धेत कास्यपदक जिंकले होते. आतापर्यंत तिने राज्यस्तरीय स्पर्धेत पंधरा पदकांची लूट केली आहे. १७ वर्षीय संस्कृती पडूळ हिचे भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य आहे. संस्कृती पडोळ हिला एनआयएस प्रशिक्षक विजय गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल भारतीय तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अशोक दुधारे, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे सचिव श्रीकांत देशमुख, विजय गाडेकर व संग्राम तारडे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.