सेलू येथे रिपब्लिकन सेनेचे जन आक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:30 AM2017-11-09T00:30:55+5:302017-11-09T00:31:02+5:30
गायरान जमिनीच्या प्रस्तावावर तत्काळ मार्ग काढावा, या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी सेलू येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : गायरान जमिनीच्या प्रस्तावावर तत्काळ मार्ग काढावा, या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी सेलू येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
रिपब्लिकन सेनेच्या वतीने संघर्ष यल्गार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त सेलू शहरासह तालुक्यातील माता रमाई आवास योजनेचे प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यावे, स्मशानभूमिची नोंद सातबाराच्या उताºयावर घेतली जावी, देवला पूनर्वसन गावातील स्मशानभूमिचा प्रश्न सोडविण्यात यावा आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने बुधवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. हे आंदोलन राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात महेंद्र सानके, रमेश भिंगारे, सुबोध काकडे, बालकिशन साळवे, राजकुमार सूर्यवंशी, चंद्रकांत बनसोडे, संजय गायकवाड, आकाश आहिरे, निलेश डुमने, गौतम मगरे, रतन मुंडे, अच्युत घुगे, रानोजी ढाले, अंकूश तांबे, भागिरथ धापसे, अर्जून बाविसे, प्रकाश बोरकर, सुरेश शिंदे, राहुल भदर्गे, अनिल तांबे, सुंदर ढोले, सुनिल डंबाळे, राजेश खरात आदींचा सहभाग होता.