खुलताबादेतील ३९ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:15+5:302021-02-05T04:07:15+5:30
आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती - कानडगाव, पळसवाडी. अनुसूचित जाती (महिला)- रसुलपुरा, पिंपरी. अनुसूचित जमाती- खांडी पिंपळगाव अनुसूचित जमाती ...
आरक्षण पुढीलप्रमाणे :
अनुसूचित जाती - कानडगाव, पळसवाडी.
अनुसूचित जाती (महिला)- रसुलपुरा, पिंपरी.
अनुसूचित जमाती- खांडी पिंपळगाव
अनुसूचित जमाती (महिला)- पाडळी- सोबलगाव.
ओबीसी - लोणी, म्हैसमाळ, देवळाणा, झरी, येसगाव
ओबीसी (महिला)- वडोद बु., कागजीपुरा, कसाबखेडा, निरगुडी बु., सोनखेडा, सराई.
सर्वसाधारण : बोडखा, कनकशीळ, पळसगाव, दरेगाव, विरमगाव, बाजार सावंगी, गल्लेबोरगाव, भडजी, खिर्डी, सुलतानपूर, गदाना.
सर्वसाधारण (महिला)- वेरूळ, धामणगाव, चिंचोली, घोडेगाव, तीसगावतांडा, ताजनापूर, सुलीभंजन, मावसाळा, तीसगाव, गोळेगाव, टाकळी राजेराय.
चौकट
वडोदमध्ये बहुमत असूनही सरपंचपद विरोधी गटाकडे?
तालुक्यातील वडोद बु. ग्रामपंचायतीत भाजप समर्थक पॅनेलचे नऊपैकी सातजण विजयी झाले असून बहुमत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलास चव्हाण यांच्या पॅनेलच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. मात्र सरपंच पदाचे आरक्षण ओबीसी महिला निघाल्याने भाजप समर्थक पॅनेलला बहुमत असूनही ओबीसी महिला सदस्या नाही, तर चव्हाण यांच्या गटाकडे सुनीता चव्हाण या ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. यामुळे बहुमत असूनही सरपंचपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फोटो कॅप्शन : खुलताबाद तालुक्यातील वडोद ग्रामपंचायतीत केवळ आरक्षणामुळे सरपंचपदाची माळ सुनीता विलास चव्हाण यांच्या गळ्यात पडणार आहे.