सोयगाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

By | Published: December 9, 2020 04:02 AM2020-12-09T04:02:36+5:302020-12-09T04:02:36+5:30

या सोडतीमध्ये ४६ ग्रामपंचायातींपैकी २३ ग्रामपंचायतींची गाव कारभाराची दोरी महिलांच्या हाती गेली असून मोठ्या ग्रामपंचायतींच्या सोडतीमध्ये १७ ग्रामपंचायती सर्वसाधारण ...

Reservation of 46 Gram Panchayats announced in Soygaon taluka | सोयगाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

सोयगाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

googlenewsNext

या सोडतीमध्ये ४६ ग्रामपंचायातींपैकी २३ ग्रामपंचायतींची गाव कारभाराची दोरी महिलांच्या हाती गेली असून मोठ्या ग्रामपंचायतींच्या सोडतीमध्ये १७ ग्रामपंचायती सर्वसाधारण आणि नागरिकांच्या मागासवर्ग यासाठी राखीव झाल्याने या ग्रामपंचायतींच्या लढतीत रंगत वाढणार आहे. निवडणुका न होऊ घातलेल्या सहा ग्रामपंचायतींच्याही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी जंगलीकोठा, वडगाव(ती.), मोहळाई, कंकराळा, देव्हारी आणि तिडका या सहा ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्या असून यामध्ये जंगलीकोठा, वडगाव(ती), मोहळाई या तीन ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

अनुसूचित जातीसाठी कवली-महिला, पहुरी(बु)-महिला, तितूर-सर्वसाधारण, डाभा-सर्वसाधारण यासाठी राखीव झाल्या आहे.

वरखेडी(बु), माळेगाव, जरंडी, उप्पलखेडा, हनुमंतखेडा आणि सावरखेडा या सहा ग्रामपंचायती ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्या असून घोसला, आमखेडा, पळसखेडा, गोंदेगाव, वनगाव, वरठाण, या सहा ग्रामपंचायती ओबीसी सर्वसाधारण गटासाठी राखीव झाल्या आहे. खुल्या प्रवर्गासाठी, निंभोरा, निमखेडी, जंगलातांडा, मोलखेडा, जामठी, घाणेगावतांडा, वाडी-सुतांडा,वरखेडी(खु), शिंदोल, बहुलखेडा, नांदगाव या बारा ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या असून फर्दापूर, नांदातांडा, दस्तापूर, टिटवी, सावळदबारा, पिंपळवाडी, रवाळा, किन्ही, बनोटी, निंबायती, वाकडी,पळाशी या बारा ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी सर्वसाधारण झाल्या आहे. तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, मकसूद शेख, सुधीर जहागीरदार, देविदास सोळुंके, दयानंद जिरगे, दीपक फुसे आदींनी याकामी पुढाकार घेतला.

Web Title: Reservation of 46 Gram Panchayats announced in Soygaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.