मराठा समाजाला आरक्षण द्या; बसस्थानक परिसरात चक्का जाम
By Admin | Published: January 31, 2017 11:13 PM2017-01-31T23:13:33+5:302017-01-31T23:32:19+5:30
चाकूर :चाकूर बसस्थानक परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
चाकूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी, या मागणीसाठी चाकूर बसस्थानक परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चाकूर तालुक्यातील विविध गावांतील भजनी मंडळांनी बसस्थानक परिसरात भजन सादर केले. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावे, अॅट्रॉसिटी कायद्यातील समज-गैरसमज दूर करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. सकाळी ९ वाजेपासून दुपारी १.३० पर्यंत आंदोलन झाले.
निलंगा : निलंगा येथे औराद, निटूर, उदगीर, शिरुर अनंतपाळकडून येणाऱ्या वाहनांना उदगीर मोड येथेच अडविण्यात आले. रुग्णवाहिका वगळता अन्य वाहनांना थांबविण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भाजप आदी सर्व पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सकाळी ९ वाजेपासून ११.३० वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. निलंगा तालुक्यातील कवठा पाटी चौरस्त्यावर, गौर, आनंदवाडी, मसलगा, कवठा आदी गावांतील नागरिकांनी सकाळी चक्का जाम आंदोलनात सहभाग नोंदविला.