शासकीय रुग्णालय घाटीमध्ये निवासी डॉक्टरांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:10 PM2019-08-07T13:10:22+5:302019-08-07T13:31:54+5:30

राज्यव्यापी विषयांसह स्थानिक सोयी सुविधांच्या विविध मागण्यांसाठी बंद

Resident doctor calls strike in government hospital ghati | शासकीय रुग्णालय घाटीमध्ये निवासी डॉक्टरांचा संप

शासकीय रुग्णालय घाटीमध्ये निवासी डॉक्टरांचा संप

googlenewsNext

औरंगाबाद : 'एनएमसी' बिल, विद्यावेतन, डॉक्टरांना विविध आजारारांसाठी रजा, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा या राज्यव्यापी विषयांसह स्थानिक सोयी सुविधांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथील निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने बेमुदत संप सुरू केला आहे.  

सकाळी ८ पासून संपाला सुरुवात झाली. यामध्ये सुमारे चारशे निवासी डॉक्टरांनी सहभाग नोंदवला आहे. सकाळी फार परिणाम जाणवत नसला तरी दुपारनंतर त्याचा परिणाम रुग्णसेवेवर जाणवायला सुरुवात होत आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात सकाळी ओपीडी सेवा देण्यात आली तसेच प्रसूती, अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीत आहेत. महाविद्यालयासमोर डॉक्टरांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. वैद्यकीय अधीक्षक, उप अधीक्षक यांनी आरएमओ, हाऊस ऑफिसर च्या मदतीने वार्ड मधील रुग्णसेवा सुरळीत सुरू ठेवण्याची तयारी केलेली आहे.

Web Title: Resident doctor calls strike in government hospital ghati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.