संपावरील निवासी डॉक्टरांनी घाटी रुग्णालयातून काढली रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 02:59 PM2018-04-27T14:59:20+5:302018-04-27T15:00:37+5:30

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी घाटीतून रॅली काढली व आपल्या मागण्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. 

A resident doctor conduct a rally from Ghati Hospital | संपावरील निवासी डॉक्टरांनी घाटी रुग्णालयातून काढली रॅली

संपावरील निवासी डॉक्टरांनी घाटी रुग्णालयातून काढली रॅली

googlenewsNext

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून एका निवासी डॉक्टरला धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्री घडली. या सगळ्या प्रकारानंतर मध्यरात्रीनंतर निवासी डॉक्टरांनी मास बंक आंदोलन पुकारले. आज या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी घाटीतून रॅली काढली व आपल्या मागण्या पूर्ततेच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. 

आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी घाटीतील निवासी डॉक्टर बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर आहेत. आंदोलनामुळे गुरुवारी दिवसभर व आज सकाळी तब्बल ३१२ निवासी डॉक्टर गैरहजर राहिली. यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

काय आहे प्रकरण 
मानेला जखम झाल्याने हर्षनगर येथील रहिवासी मधुकर चांदणे (५५) यांना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी घाटीतील अपघात विभागात दाखल केले. यावेळी १५ ते २० नातेवाईकांनी रुग्णाभोवती गर्दी केली. गर्दी आणि उपचाराच्या कारणावरून नातेवाईक आणि निवासी डॉक्टरांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी गर्दी न करता मोजक्याच नातेवाईकांनी थांबण्याची सूचना करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या एका नातेवाईकाने डॉ. हर्षद चव्हाण यांना धक्काबुक्की केली. यानंतर अन्य एका नातेवाईकाने हुज्जत घालून थेट डॉ. चव्हाण यांची कॉलर पकडली. 
या घटनेची माहिती मिळाल्याने सहयोगी प्रा. डॉ. सुरेश हरबडे हे अपघात विभागात पोहोचले. यावेळी एक नातेवाईक त्यांच्यावरही धावून गेला. कारण नसताना मारहाण व धक्काबुक्की केल्याचा आरोप करून निवासी डॉक्टरांनी मध्यरात्रीपासून मास बंक करीत काम बंद केले. यावेळी डॉक्टरांनी जोरदार घोषणा दिल्या. या प्रकाराची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे आणि वरिष्ठ डॉक्टरांनी घाटीत धाव घेऊन निवासी डॉक्टरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

यासोबतच गुरुवारी अधिष्ठातांच्या कक्षात उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या उपस्थितीत  निवासी डॉक्टरांची बैठक झाली मात्र यावर तोडगा निघाला नाही. यामुळेच निवासी डॉक्टरांनी आंदोलन तीव्र करत आज सकाळी रुग्णालयातून रॅली काढली.

Web Title: A resident doctor conduct a rally from Ghati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.