मारहाणीनंतर घाटीतील निवासी डॉक्टरांचा मास बंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 09:26 AM2018-10-16T09:26:51+5:302018-10-16T09:28:41+5:30
घाटी रुग्णालयात सलग दोन दिवस मारहाणीनंतर निवासी डॉक्टरांचा मास बंक
औरंगाबाद : रुग्णाच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर घाटीतील निवासी डॉक्टर आज मास बंक वर गेले.
सलग दोन दिवस निवासी डॉक्टरांना मारहाण झाली. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत निवासी डॉक्टरापर्यंत बैठक घेतली. यानंतर मास बंकचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे.
मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेने घाटी प्रशासनाकडे सुरक्षेचा उपाययोजना तात्काळ करण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नसल्याने सोमवारी रात्री १२ वाजता सर्जिकल व मेडिसिन इमारतीमधील सर्व निवासी डॉक्टर जमा झाले. यावेळी त्यांनी रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली.