आरक्षणाने नोकरीचे प्रश्न सुटण्याची शक्यता कमी : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 04:54 PM2018-08-04T16:54:00+5:302018-08-04T17:03:58+5:30

आरक्षण मिळाले तरी याचा फायदा केवळ शैक्षणिकदृष्ट्या होऊ शकतो, असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. 

Resignation less likely to solve job problems: Nitin Gadkari | आरक्षणाने नोकरीचे प्रश्न सुटण्याची शक्यता कमी : नितीन गडकरी

आरक्षणाने नोकरीचे प्रश्न सुटण्याची शक्यता कमी : नितीन गडकरी

googlenewsNext
ठळक मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आरक्षणासाठी विरोधकांनी सहकार्य करावे 

औरंगाबाद : सरकारी क्षेत्रात नोकऱ्यांचे कमी होत आहे. त्यामुळे आरक्षण मिळाले तरी याचा फायदा केवळ शैक्षणिकदृष्ट्या होऊ शकतो, असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. यासंदर्भात केंद्रीय गडकरी यांना प्रश्न विचारला असता शेतमालाला भाव नाही, रोजगार नसल्याने आलेल्या नैराश्यातून मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, जात, पंथ, धर्म आणि भाषा यावरील राजकारण थांबविण्याची आवश्यकता आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणावर विचार करण्याची गरज आहे. गरीब हा गरीब असतो. त्याला जात , पंथ, धर्म नसतो. 

आरक्षणासाठी विरोधकांनी सहकार्य करावे 
देशात सामाजिक आणि शैक्षणिक निकषावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गांसाठी आरक्षण लागू करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्यांची मर्यादी ठरवून दिलेली आहे. याची मर्यादा वाढवायची असेल आणि मराठा आरक्षण द्यायचे असेल तर घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. यात विरोधकांनी सहकार्य केले तरच घटनादुरुस्ती होऊ शकते, असेही ते म्हणाले.

Web Title: Resignation less likely to solve job problems: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.