लाखोंचा घोटाळा करून व्हॉट्सॲपवर पाठवला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 06:40 AM2024-03-03T06:40:32+5:302024-03-03T06:41:08+5:30
हा घोटाळा निदर्शनास आल्यानंतर जयनेंद्र हेमनानी (रा. नवसारी, गुजरात) याच्यावर वेदांतनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : कंपनीच्या ग्राहकांसोबतचा व्यवहार सांभाळत असतानाच अकाऊंट मॅनेजरनेच १० लाख ५२ हजार रुपये परस्पर लंपास केले. त्यानंतर मालकाला व्हॉट्सॲपवरच राजीनामा पाठवून पसार झाला. हा घोटाळा निदर्शनास आल्यानंतर जयनेंद्र हेमनानी (रा. नवसारी, गुजरात) याच्यावर वेदांतनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल लड्डा (वय ३८, रा. शिल्पनगर) यांची कवीश इंटरकॉन्टिनेंटल, अनुमती सेल्स अँड ऑपरेशन व ओम ग्रीनटेक इंडस्ट्रिज या फर्म चालवतात. २०१९ मध्ये त्यांनी जयनेंद्रला अकाऊंट मॅनेजर म्हणून कामावर ठेवले. तो विश्वासूही होता. त्याचा गैरफायदा घेत त्याने घोटाळा केला.