पाणी सोडण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:51 PM2017-11-12T23:51:10+5:302017-11-12T23:51:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चित्तेपिंपळगाव : गारखेडा परिसरातील सुखना धरणाचे पाणी सोडण्यास परिसरातील नागरिकांनी विरोध करून शाखा अभियंत्यास घेराव घालून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चित्तेपिंपळगाव : गारखेडा परिसरातील सुखना धरणाचे पाणी सोडण्यास परिसरातील नागरिकांनी विरोध करून शाखा अभियंत्यास घेराव घालून रविवारी धारेवर धरले. सरपंच मीना चौधरी यांनी वरिष्ठांकडे निवेदन देऊन पाणी सोडण्यास आठवड्यापूर्वीच विरोध केला असताना अभियंता हेतूपुरस्सर पाणी सोडण्याचा प्रताप करीत असल्याचा शेतक-यांंनी आरोप केला.
शाखा अभियंता मारोती कल्याणी यांनी चा-या सफाईसाठी जेसीबी तसेच बुलडोजर घेऊन धरण परिसरात दाखल झाले होते. रविवार असतानादेखील दुरुस्तीच्या हालचाली सुरू केल्याने १२ गावांच्या ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करून विरोध केला.
पाणी सोडू देणार नाही, अशी भूमिका मुरलीधर चौधरी, सुनील चौधरी, श्रीमंत चौधरी, अनिल चौधरी, शिवाजी चौधरी, सुभाष चौधरी, गणेश चौधरी, अप्पासाहेब चौधरी, संतोष पवार, भास्कर चौधरी, दत्ता बनसोडे, दिलीप चौधरी, दिनेश चौधरी, अण्णा देहाडे, विष्णू चौधरी, किशोर चौधरी, ज्ञानेश्वर घोडके, संतोष दहीहांडे, नारायण पठाडे, नाथा भोकरे, जिजा चौधरी, तुकाराम चौधरी, बप्पा पठाडे, योगेश चौधरी, तुकाराम पवार, भगवान गावंडे, धनंजय भोसले यांनी
घेतली.
पाणी वाया जाईल...
या धरणावर जवळपास १२ गावांच्या नागरिकांच्या विहिरी अवलंबून असल्याने पाणी साठवून ठेवणे गरजेचे आहे. चाºयांची अवस्था वाईट झाल्याने पाणी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार नाही. पाणी वाया जाईल, असे मत शैलेश चौधरी यांनी
मांडले.