मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:54 AM2019-09-17T11:54:42+5:302019-09-17T11:56:06+5:30

शासनाची ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ महत्त्वकांक्षी योजना 

Resolution to free the drought-free Marathwada | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प

googlenewsNext
ठळक मुद्देवॉटर ग्रीडच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पाणी मिळणार

औरंगाबाद : निजामांच्या जोखडातून मुक्त झालेल्या मराठवाड्याला आता दुष्काळमुक्त करावयाचे आहे. यासाठी शासनाने मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्त्वकांक्षी योजना आखली असून याच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहचविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. यानंतर जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासनाने मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी संकल्प केलेला आहे. दुष्काळमुक्तीसाठी मराठवाड्यातील धरणे लूप पद्धतीने जोडून 64 हजार किलो मीटरच्या पाईपलाईनच्या माध्यमातून प्रत्येक गावात पाणी पोहचविणार. या कामाला सुरूवात झाली असून चार जिल्ह्यांच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. आणखी चार जिल्ह्यांच्या निविदा प्रक्रिया लवकरच पूर्णत्वास येतील व वॉटर ग्रीड प्रकल्प पूर्ण होईल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्याचा विकासाला अधिक चालना देण्यासाठी नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते डीएमआयसी टप्पा एकचे लोकार्पण करण्यात आले आहे. यातून मराठवाड्यातील औरंगाबाद-जालना उद्योगाचे मॅग्नेट आगामी काळात तयार होऊन  तरुणांच्या हाताला काम मिळेल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सदस्य सचिव विष्णूपंत धाबेकर, आमदार अंबादास दानवे, प्रशांत बंब, भाऊसाहेब चिकटगावकर, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त निपुण विनायक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर,  विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.
 

Web Title: Resolution to free the drought-free Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.