सिद्धेश्वरचे पाणी सोडण्याचा ठराव
By Admin | Published: March 17, 2016 11:48 PM2016-03-17T23:48:27+5:302016-03-17T23:52:00+5:30
हिंगोली : सध्या पाणीटंचाईचा नदीकाठच्या गावांत कहर झाला आहे.
हिंगोली : सध्या पाणीटंचाईचा नदीकाठच्या गावांत कहर झाला आहे. त्यामुळे येलदरी धरणातून सिद्धेश्वरमध्ये सोडण्यात यावे. तर तेथून गुरे व नागरिकांना टंचाईत दिलासा होईल, एवढे पाणी सोडण्याचा ठराव जि. प. च्या जलव्यवस्थापन समितीत घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, सभापती अशोक हरण, सहेल्याबाई भोकरे, शोभाबाई झुंझुर्डे यांची उपस्थिती होती. यावेळी हागणदारीमुक्त गावांची माहिती देण्यात आली. त्यात कळमनुरी तालुक्यातील बिबगव्हाण, बोल्डावाडी, किल्लेवडगाव, पुयना, माळेगाव, फुटाणा, कोंढूर, वसमत तालुक्यातील कुरुंदवाडी, बोरगाव, माळवटा, किन्होळा, औंढा तालुक्यातील काठोडा तांडा, देवाळा तुर्क, रामेश्वर, वगरवाडी, सुरेगाव, सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा, माहेरखेडा, चोंढी, लिंबाळा-आमदरी, हिंगोली तालुक्यातील वांझोळा, पिंपळखुटा, समगा, कळमकोंडा, हिरडी या गावांचा समावेश आहे. तर मागील काही दिवसांत २२0 पैकी १७ गावच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या. त्यामुळे पूर्ण योजनांची संख्या १३५ वर गेली. तर अपूर्ण योजना ८५ झाल्या आहेत. चालू योजना १७६ तर बंद ४४ आहेत.