राज्यातील विद्यापीठांमधील अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:39 AM2017-12-16T00:39:36+5:302017-12-16T00:39:50+5:30
आजच्या सोशल जमान्यात समाजमाध्यमांमध्ये विविधि गोष्टीवर सकारात्मक चर्चा होत आहेत. या चर्चामधून अनेक चांगल्या गोष्टी समोर येतात. अशाच उच्च शिक्षणातील उच्च पदस्थ अधिकारी, कुलगुरू, प्राध्यापक, अधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असलेल्या हायर एज्यूकेशन या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये राज्यातील अकृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचा-यांच्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्रत्येक तीन वर्षांनी बदल्या होण्याचा ठराव मांडण्यात आला आहे.
- राम शिनगारे
औरंगाबाद : आजच्या सोशल जमान्यात समाजमाध्यमांमध्ये विविधि गोष्टीवर सकारात्मक चर्चा होत आहेत. या चर्चामधून अनेक चांगल्या गोष्टी समोर येतात. अशाच उच्च शिक्षणातील उच्च पदस्थ अधिकारी, कुलगुरू, प्राध्यापक, अधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असलेल्या हायर एज्यूकेशन या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये राज्यातील अकृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचा-यांच्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्रत्येक तीन वर्षांनी बदल्या होण्याचा ठराव मांडण्यात आला आहे. या ठरावाला अनेकांनी अनुमोदनही दिले.
विविध क्षेत्रातील व्यक्ती एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावीपणे वापर करतात. यासाठी फेसबुक, व्हाटस्अपवर ग्रुप बनवतात. आवड असणा-या व्यक्ती अशा ग्रुपमधून आपली मते प्रभावीपणे मांडत असतात. शालेश शिक्षणातील विविध विषयांवर सदृढ चर्चा झाल्यानंतर नुकतेच या चर्चेचे चक्क पुस्तक काढण्यात आले आहे. शिक्षण विकास मंच या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विभागाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपने ही सदृढ चर्चा केली. यातुन व्हॉटसअॅप चर्चा शिक्षण विकासाच्या या नावाचा ग्रंथही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित आला. अशाच पद्धतीची सकस चर्चा पुण्यातील एका ज्येष्ठ पत्रकाराने तयार केलेल्या हायर एज्युकेशन नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये होत असते. अधिका-यांचा भ्रष्टाचार असो, की कर्मचा-यांचे विद्यापीठांमध्ये होणार गैरवर्तन. अशा विविध विषयांवर नियमित चर्चा होत असते. शुक्रवारी सकाळी झालेल्या चर्चेत पुणे विद्यापीठातील एका शिपायाने चक्क एका बिल्डरकडून पैसे घेऊन विद्यापीठाच्या जागेत राडारोड आणि गौणखनिज टाकण्यास सांगितले. मात्र हे टाकण्यासाठी विद्यापीठ परिसरात ७ ट्रक आल्यानंतर यासाठी परवानगी घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले. याविषयी सुद्धा ग्रुपमध्ये चांगलीच चर्चा झाली. संध्याकाळच्या सत्रात विविध विद्यापीठांमध्ये मुजोर बनलेले अधिकारी आणि कर्मचा-यांच्या बदल्या विद्यापीठातंर्गत झाल्या पाहिजेत. याविषयी डॉ. विक्रम खिलारे यांनी ठरावच मांडला. तत्पुर्वी यावर मोठी वादळी चर्चा झाली. या विषयावर चर्चेची सुरुवात प्रा. अभिजीत पंडित यांनी केली. कुलगुरू व कुलसचिव हे आयएएस अधिकारी असावेत, असे त्यांनी औरंगाबादच्या विद्यापीठात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे नवीन विद्यापीठ कायद्यासंदर्भात आयोजित चर्चासत्रात आले तेव्हा सुचविले होते. तेव्हा पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती झालेले राजेश पांडे हे सुद्धा उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. यावर विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी सर्वांच्या कार्यपद्धतीवर विविध मान्यवरांनी मतप्रदर्शन केले. यात डॉ. विक्रम खिलारे यांनी विविध वेळी आयएएस अधिकारी कुलगुरू म्हणून कार्य करताना यशस्वी झाल्याचे उदाहरणांसह दाखवून दिले. यातुन राज्यातील एकुण १२ अकृषी विद्यापीठांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या विद्यापीठातंर्गत तीन वर्षांनी करण्याचा विषय चर्चेला आला. अशा बदल्या झाल्यास विद्यापीठांमध्ये भ्रष्टाचारांचे आणि लागेबाध्याचे तयार झालेले कडबोळे नष्ठ होईल. अनेकांच्या असणा-या सेटिंग्ज संपुष्ठात येतील. काहींनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी एकत्र येत राज्यपाल आणि शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करावी, असेही मत मांडले. ही गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी याविषयी ठराव मांडण्याची कल्पनाही समोर आली. तेव्हा यावर डॉ. विक्रम खिलारे यांनी आठ ओळींचा चक्क ठराव मांडला. याला काही तज्ज्ञांनी अनुमोदनही दिले. काहींनी हा विषय नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदरांनी मांडला पाहिजे, असेही मत व्यक्त केले. या ग्रुपमध्ये पुण्यातील भाजपाच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना तशी विनंतीही करण्यात आली. आता ही चर्चा पुढे सरकण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.