स्व: संरक्षण कार्यशाळेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:50 AM2018-01-19T00:50:03+5:302018-01-19T00:50:20+5:30
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त युवकांसाठी आयोजित स्वसंरक्षण कार्यशाळेस उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कार्यशाळेत मुख्य प्रशिक्षक लता कलवार यांनी मार्गदर्शन केले.
औरंगाबाद : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त युवकांसाठी आयोजित स्वसंरक्षण कार्यशाळेस उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कार्यशाळेत मुख्य प्रशिक्षक लता कलवार यांनी मार्गदर्शन केले.
कोणतेही शस्त्र न बाळगता बचाव कसा करावा, तसेच न घाबरता स्वत:चा आणि आपल्या मित्र, मैत्रिणी, बहीण भावंडांचा बचाव करण्याचे धडे या कार्यशाळेत देण्यात आले. या प्रसंगी यश हिरे, हर्षल भुईगळ, अनुराग शेरे, पार्थ लोखंडे, रितेश गायकवाड, भक्ती वाघ, कणक बारोजे, राधिका शर्मा, वैष्णवी भांडे, साईराज टोकलवाड, प्रतीक आढाव, शीतल राठोड, प्रतीक काळे, आशुतोष सावजी, कौस्तुभ यांनी प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी लता कलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम गोरे, साक्षी साकळकर, अंतरा हिरे, प्रतीक जांभूळकर, प्रीती खरात, विवेक देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.