पाककला स्पर्धेस उत्स्फू र्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:39 PM2019-05-25T22:39:05+5:302019-05-25T22:39:12+5:30

जानकीदेवी बजाज सेवाभावी संस्थेतर्फे पंढरपूर येथे आयोजित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Respondent response to the culinary competition | पाककला स्पर्धेस उत्स्फू र्त प्रतिसाद

पाककला स्पर्धेस उत्स्फू र्त प्रतिसाद

googlenewsNext

वाळूज महानगर : जानकीदेवी बजाज सेवाभावी संस्थेतर्फे पंढरपूर येथे आयोजित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


बजाज विहार केंद्रात महिलांसाठी शनिवारी पाककला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत महिला-तरुणींनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रात्याक्षिक सादर केले. आंबा, कैरी पासून तयार केलेले लाडू, केक, लाडू, चटणी, लोणचे, मिठाई, आमरस थाळी, लस्सी आदी खाद्यपदार्थ बनवून त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी अनेकांनी या स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

परीक्षक म्हणून विणाताई काटेकर, सुनिता तगारे, ऐश्वर्या मोहिते, सुवर्णा इंगळे यांनी काम पाहिले. गोड पदार्थांमध्ये श्वेता दिक्षीत, असावरी बोकणकर, पूनम पगारे यांना तर तिखट पदार्थामध्ये दीपिका चव्हाण, शिवाणी दानवे, आरती काळे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. प्रियंका जैन, अलका देशपांडे व अर्चना चव्हाण यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

Web Title: Respondent response to the culinary competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज