तीसगाव परिसरात महावृक्षारोपण मोहिमेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:05 AM2021-06-27T04:05:07+5:302021-06-27T04:05:07+5:30
वाळूज महानगर : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तीसगाव परिसरात शनिवारी (दि. २६) महावृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात ...
वाळूज महानगर : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तीसगाव परिसरात शनिवारी (दि. २६) महावृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोधीसत्व ध्यान साधना केंद्राच्या पुढाकाराने परिसरात विविध जातीची दोन हजार झाडे लावण्यात आली.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बोधिसत्व ध्यान साधना केंद्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अंजन साळवे यांनी महावृक्षारोपण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अभिनेत्री कोमल मोरे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मधुकर प्रधान, सरपंच शकुंतला कसुरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून रामनाथ चोपडे, रामचंद्र कसुरे, प्रभाकर बकले, जि. प. सदस्य श्याम बनसोडे, अर्जुन आदमाने, संतोष लाठे, किशोर म्हस्के, प्रवीण नितनवरे, सुखदेव सोनवणे, एल. एल. गायकवाड, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर तीसगावच्या खवड्या डोंगर व ध्यान साधना केंद्राच्या परिसरात पिंपळ, वड, कडुलिंब, सीताफळ, अशोक, चिंच, कवठ, जांभूळ, सिसम, नारळ, आदी वेगवेगळ्या जातीची जवळपास दोन हजार झाडे लावून ही झाडे जगविण्याचा संकल्प करण्यात आला. या महावृक्षारोपण अभियानात परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरिक, दगडोजीराव देशमुख विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदान करून झाडे लावली. मुख्याध्यापक सुधीर शेषवरे यांनी सूत्रसंचालन केले. अंजन साळवे यांनी प्रास्ताविक केले, तर एस. पी. हिवराळे यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. संजय संभाळकर, भरतसिंग सलामपुरे, पोपट रसाळ, विष्णू पाटील, विष्णू रोरे, विठ्ठल चोपडे, विजय राऊत, बी. एस. दिपके, राजेंद्र साळवे, सुशांत भुजंगे, महेश निनाळे, प्रकाश निकम, अमोल भालेराव, सिद्धार्थ बनकर, के. व्ही. गायकवाड, अनिल वाघ, अशोक त्रिभुवन, आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ
तीसगाव परिसरात बोधिसत्व ध्यान साधना केंद्राच्या पुढाकाराने महावृक्षारोपण मोहिमेत वृक्षारोपण प्रसंगी अभिनेत्री कोमल मोरे, अंजन साळवे, सुशांत भुजंगे, आदी उपस्थित होते.