जिल्हा बंदला प्रतिसाद

By Admin | Published: November 16, 2014 12:17 AM2014-11-16T00:17:05+5:302014-11-16T00:38:15+5:30

बीड : मराठा आरक्षणाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती़ याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले़ मराठा आरक्षण सम्नवय समितीने पुकारलेल्या बंदला

Responses to the District Offices | जिल्हा बंदला प्रतिसाद

जिल्हा बंदला प्रतिसाद

googlenewsNext


बीड : मराठा आरक्षणाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती़ याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले़ मराठा आरक्षण सम्नवय समितीने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ शहर दिवसभर कडकडीत बंद होते़ इतर तालुक्यांमध्येही आंदोलने झाली़ रॅली, घोषणांनी संपूर्ण जिल्हा दणाणून गेला़
शासकीय विश्रामगृहापासून सकाळी ११ वाजता रॅलीला सुरुवात झाली़ यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, साठे चौक, सुभाष रोड, अहिल्यादेवी पुतळा, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक, माळीवेसमार्गे नगर रोडवरुन रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली़ तेथे निदर्शने करण्यात आली़ त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले़ राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडावी़ त्यासाठी तज्ज्ञ समिती नेमून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी निमंत्रक अशोक हिंगे यांनी केली़ माजी आ़ राजेंद्र जगताप, रावसाहेब मस्के, विनोद इंगोले़, गणेश बजगुडे, भाऊसाहेब डावकर, अशोक सुखवसे, सचिन मुळूक, अ‍ॅड़ महेश धांडे, किशोर पिंगळे, शैलेश जाधव, सुनील सुरवसे, शरद चव्हाण, संतोष जाधव, विजय लव्हाळे, सचिन उबाळे, युवराज जगताप, राहुल दुबाले, विजय लव्हाळे, मुकुंद गोरे, युवराज मस्के, राहुल वाईकर, गणेश नाईकवाडे, गंगाधर काळकुटे, विनोद चव्हाण, संगमेश्वर आंधळकर, गणेश मस्के, संकेत मस्के, नागेश तांबारे आदी सहभागी झाले होते़ तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी शाळा, महाविद्यालये, व्यापारपेठेत जाऊन बंदचे आवाहन केले़ त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ सुभाष रोड, भाजीमंडई, नगररोड, जालनारोडवरील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला़ बीड तालुक्यातील घाटसावळी येथेही आंदोलन झाले़ हॉटेल, दुकाने दिवसभर बंद होती़
धारुर कडकडीत बंद
आरक्षणप्रश्नी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला़ व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला़ अ‍ॅड़ परमेश्वर शिनगारे, सुरेश फावडे, राम चव्हाण, अ‍ॅड़ मोहन भोसले, सुरेश शिनगारे, सुरेश शेळके, मनोज भोसले, गणेश थोरात, अनंता भोसले, बापू खामकर, पवन तट, बंडू फावडे यांनी बंदचे आवाहन केले़ त्यानंतर तहसीलकार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ नायब तहसीलदार के़ आऱ गेंदले यांना निवेदन देण्यात आले़
शिरुरमध्येही पडसाद
येथील व्यापरपेठ सकाळपासूनच बंद होती़ आरक्षणप्रश्नी सत्ताधाऱ्यांनी न्यायालयात कणखरपणे बाजू मांडावी, या मागणीसाठी शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली़ किशोर खोले, हनुमंत गायकवाड, सुनील झेंड, बाबूराव शिंदे, सूर्यकांत आमले, अनंत काटे, भागवत मोरे, राम गायकवाड, बाळू गायकवाड यांनी बंदचे आवाहन करुन तहसीलदारांना निवेदन दिले़ पाटोदा येथेही आंदोलन करण्यात आले़ व्यापारपेठ कडकडीत बंद होती़ बंद दरम्यान अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त होता. (प्रतिनिधींकडून)

Web Title: Responses to the District Offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.