सूक्ष्म कंटेन्मेंट झोनमधील जबाबदारी सोसायट्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:02 AM2021-04-16T04:02:11+5:302021-04-16T04:02:11+5:30
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, शहरात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने कंटेन्मेंट झोन जाहीर ...
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, शहरात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने कंटेन्मेंट झोन जाहीर केले. झोन तीन प्रकारचे आहेत. सूक्ष्म, मध्यम, मोठे असे तीन प्रकारचे कंटेन्मेंट झोन आहेत. यातील मायक्रो कंटेन्मेंट झोनमधील संसर्ग कमी करण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे. अर्पाटमेंट, टाऊनशिपमधील २० टक्के नागरिक बाधित आल्याने हे भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सोसायटी अध्यक्ष व सचिवांवर अपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त चाचण्या करून घेणे, लसीकरण करणे अशा जबाबदाऱ्या टाकल्या जाणार आहेत. चाचण्यांनंतर कोणी बाधित आढळल्यास त्याची माहिती महापालिकेला कळवावी लागेल. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोनमधील स्वयंसेवकांनी समोर यावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.
एचआरसीटी गरज असेल तरच
बाधित आल्यानंतर अनेक जण एचआरसीटी टेस्ट करीत आहेत. याबाबत केंद्रीय पथकाने मागील आठवड्यात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एचआरसीटी चाचणी करू नये, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले.
रेमडेसिविरचा मुबलक साठा
कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा शहरात मुबलक साठा आहे. आणखी इंजेक्शनची खरेदी केली जात आहे. तसेच अँटिजन पद्धतीच्या तीन लाख तर आरटीपीसीआर पद्धतीच्या ६० हजार कोरोना चाचणी कीट उपलब्ध आहेत.