पक्षीसंवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी

By Admin | Published: January 7, 2017 11:00 PM2017-01-07T23:00:01+5:302017-01-07T23:03:23+5:30

अंबाजोगाई :‘यस’ संघटनेच्या वतीने ७ व ८ जानेवारी रोजी ३० वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन येथील एका मंगल कार्यालयात सुरू आहे.

Responsible for every citizen of bird culture | पक्षीसंवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी

पक्षीसंवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी

googlenewsNext

अंबाजोगाई : मराठवाडयात व महाराष्ट्राला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत पक्षांचे संवर्धन व संगोपन करण्याची मोठी जबाबदारी पक्षीमित्रांवर आहे. या कामासाठी पक्षीमित्रांनी पुढाकार घेऊन विविध पक्षांचे संगोपन करावे, असे आवाहन पर्यावरण अभ्यासक विजय दिवाण यांनी केले.
‘यस’ संघटनेच्या वतीने ७ व ८ जानेवारी रोजी ३० वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन येथील एका मंगल कार्यालयात सुरू आहे. शनिवारी सकाळी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होेते.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रचना मोदी होत्या. व्यासपीठावर २९ व्या संमेलनाचे अध्यक्ष शरद आपटे, विभागीय वनाधिकारी अमोल सातपुते, स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, चंद्रशेखर वडमारे, ‘यस’ संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर निकम, सचिव शंकर कराड उपस्थित होते.
यावेळी दिवाण म्हणाले की, महाराष्ट्राचा जलविकासात प्रथम क्रमांक लागत असून आजही १६६ तालुके व ११ हजार खेडी दुष्काळाच्या झळा तीव्रतेने सहन करीत आहेत. याचा मोठा परिणाम प्राणी व पक्षी यांच्या जीवनावर होतो. मराठवाडयात तर पाणीतूट व पर्जन्यमान अस्थिर असल्यामुळे ७६ तालुक्यांपैकी ६१ तालुक्यांची पाणीपातळी अत्यंत खालवलेली आहे. अशा स्थितीत वृक्ष लागवड व पक्षीसंवर्धन करणे हे मोठ्या जिकीरीचे काम आहे.
शरद आपटे म्हणाले की, केवळ पक्षांचे निरीक्षणच न करता पक्षांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना या संमेलनात आखल्या जाव्यात पक्षीमित्रांची संख्या वाढवून पर्यावरण व वृक्षारोपण जोपासण्यासाठी सामुहिक पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
वनाधिकारी सातपुते यांनी घुबड, गिधाड, टिवटिवी या पक्ष्यांना अंधश्रद्धेपोटी अशुभ मानले जाते. पर्यावरणातील महत्त्व समाजासमोर मांडल्याशिवाय पक्षांबद्दलची आस्था समाजात निर्माण होणार नाही. पक्षी वृद्धींगत करण्यासाठी वनविभाग पक्षीमित्रांसोबत राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
चंद्रशेखर वडमारे, नगराध्यक्षा मोदी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. शुभदा लोहिया यांनी केले. आभार शंकर कराड यांनी मानले. संमेलनासाठी महाराष्ट्रातून पक्षीमित्र दाखल झाले आहेत. संमेलनासाठी यस संघटनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Responsible for every citizen of bird culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.