परीक्षांचे निकाल वेळेत

By Admin | Published: May 31, 2016 12:10 AM2016-05-31T00:10:50+5:302016-05-31T00:42:59+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या जवळपास सर्वच परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून,

Result of the exams in time | परीक्षांचे निकाल वेळेत

परीक्षांचे निकाल वेळेत

googlenewsNext


औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या जवळपास सर्वच परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, तीन ते चार विषयांचे निकालही येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होणार आहेत. मागील चार ते पाच वर्षांत विद्यापीठाने मे महिन्यात निकाल देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने विद्यार्थ्यांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.
बी. ए. चे (सर्व सत्रांचे) निकाल सोमवारी सायंकाळी घोषित करण्यात आले. तर बी. एस्सी. (सहावे सत्र) अंतिम वर्षाचा निकाल ६६ टक्के लागला आहे. परीक्षा दिलेल्या १४,३६२ विद्यार्थ्यांपैकी ९,६६८ जण उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके यांनी दिली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी यंदा सर्व परीक्षा वेळेआधी सुरू करण्याच्या तसेच निकाल वेळेवर लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. पदवी आणि काही पदव्युत्तर परीक्षांचे निकाल विद्यापीठाने आतापर्यंत जाहीर केले आहेत. यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशाचे, सीईटीचे नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
अभियांत्रिकीचे निकाल १५ जुलैपर्यंत
दरम्यान, अभियांत्रिकी निकालासंदर्भात सोमवारी विद्यापीठात अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी परीक्षा मंडळ सभागृहात बैठक झाली.
परीक्षा नियंत्रक डॉ. नेटके म्हणाले, अभियांत्रिकी व फार्मसी प्रथम वर्षाचे निकाल १५ जूनपूर्वीच लावण्यात यावेत, असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी पत्राद्वारे कळविले आहे. या अनुषंगाने परीक्षा विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रथम वर्षाचे निकाल २० जूनपर्यंत तर उर्वरित सर्व निकाल १५ जुलैपर्यंत घोषित करण्यात येतील, असेही ते म्हणाले. मूल्यांकनासाठी जास्तीत जास्त शिक्षकांना पाठवावे, असे आवाहन कुलगुरूंनी केले. सर्व प्राचार्यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीस माजी अधिष्ठाता डॉ. उल्हास शिंदे, मूल्यांकन केंद्रप्रमुख डॉ. सूर्यकांत जगदाळे, प्रा. एम. यू. पोपळे, कक्षाधिकारी डॉ. पंजाब पडूळ यांच्यासह २५ प्राचार्य प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Result of the exams in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.