रिक्त पदांचा होतोय आरोग्य सेवेवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:49 AM2017-09-29T00:49:24+5:302017-09-29T00:49:24+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांसह इतर कर्मचाºयांची १० पदे रिक्त आहेत़ याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत असून, रुग्णांना खाजगी दवाखाना गाठावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांसह इतर कर्मचाºयांची १० पदे रिक्त आहेत़ याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत असून, रुग्णांना खाजगी दवाखाना गाठावा लागत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील ४४ गावे जोडण्यात आली आहेत. आरोग्य केंद्रामध्ये ३२ पदे मंजूर आहेत. आरोग्य केंद्रामध्ये बाजाराच्या दिवशी २०० ते ३०० रूग्ण उपचारासाठी येतात़ सुरवातीला काही वर्ष कर्मचारी वर्ग बºयापैकी उपलब्ध करून देण्यात होता; परंतु, त्यानंतर मात्र रिक्त पदे वाढण्यास सुरुवात झाली. सध्या ३२ मंजूर पदांपैकी एक वैद्यकीय अधिकारी पद तीन महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे एकाच वैद्यकीय अधिकाºयावर ४२ गावांचा भार आला आहे. तसेच औषध निर्माता, परिचारिक, लिपिक, आरोग्य सेविका, सेवक, सफाई कामगारांसह १० पदे रिक्त आहेत. रिक्त पदे वाढल्याने रूग्णांना आरोग्य सेवा पुरविताना उपलब्ध कर्मचाºयांच्या नाकीनऊ येत आहे. रिक्त औषध निर्माता पदाच्या ठिकाणी तर कोणीही बसून रूग्णांना औषधी देत आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस चुकीचे औषध दिल्या गेल्यास रूग्णांसाठी धोकाही निर्माण होत आहे़ शिवाय रुग्णांना सुविधाही उपलब्ध होत नाहीत. एखादा गंभीर रुग्ण आल्यास केवळ नोंद करून रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे.