दहावीच्या १०,८५३ विद्यार्थ्यांचा निकाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:04 AM2021-07-02T04:04:11+5:302021-07-02T04:04:11+5:30
औरंगाबाद : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेसाठी शेवटचा एक दिवस शिल्लक राहिला आहे. आतापर्यंत ९३.८९ टक्के निकाल भरण्याचे ...
औरंगाबाद : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेसाठी शेवटचा एक दिवस शिल्लक राहिला आहे. आतापर्यंत ९३.८९ टक्के निकाल भरण्याचे काम पूर्ण झाले, तर ६६.१२ टक्के निकाल भरून शाळांनी निश्चिती केली. अद्याप १० हजार ७१९ विद्यार्थ्यांचे निकाल भरणे प्रलंबित असल्याने आतापर्यंत निकाल न भरलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल का भरले नाही, याची विचारणा विभागीय शिक्षण मंडळाकडून शाळांकडे केली जात आहे.
विभागीय शिक्षण मंडळातील पाच जिल्ह्यांत दहावीच्या १ लाख ७७ हजार ७६२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १७ हजार १६८ विद्यार्थ्यांचे निकाल भरून शाळांकडून निश्चित करण्यात आले आहेत. विभागात निकालाचे ९३.८९ टक्के काम पूर्ण झाले. त्यातून ६६.१२ टक्के विद्यार्थ्यांचे निकाल शाळांकडून निश्चित केले गेले. मात्र, अद्याप १० हजार ८५३ विद्यार्थ्यांचे निकाल भरले गेले नाही, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने आणि सहसचिव आर. पी. पाटील यांनी दिली.
निकाल न भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तालुकानिहाय एकगठ्ठा आहे. त्यामुळे निकाल का भरले नाही. त्यांना काय अडचण आहे. बोर्डाकडून शाळांना संपर्क साधून त्याची कारणमीमांसा गुरुवारी दुपारी सुरू होती. निकाल ऑनलाइन भरण्यात हिंगोली, बीड जिल्हा आघाडीवर असून, औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी प्रलंबित आहेत. प्रलंबित निकाल भरण्यासाठी अद्याप मुदतवाढीसंदर्भात कोणतीही सूचना नाही. एकाच वेळी सर्वच शाळा निकाल भरण्याची कामे करत असल्याने प्रणालीवर ताण येत असल्याचे सचिव पुन्ने म्हणाल्या.
---
जिल्ह्यानिहाय निकाल ऑनलाइन भरल्याची स्थिती
जिल्हा : निकालाचे काम पूर्णः प्रलंबित विद्यार्थी संख्या
औरंगाबाद - ९३.८५ - ३८९९
बीड - ९४.०७ - २४३९
परभणी - ९३.८४ - १६७०
जालना - ९३.७७ - १९०४
हिंगोली - ९४.५४ - ८४८
---