‘सीबीएसई’ १२वीचा निकाल जाहीर
By Admin | Published: May 22, 2016 12:25 AM2016-05-22T00:25:18+5:302016-05-22T00:40:01+5:30
औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. यंदाच्या निकालातही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली.
औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. यंदाच्या निकालातही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली. १ मार्च ते २२ एप्रिल २०१६ या कालावधीत झालेली ही परीक्षा औरंगाबादेतील जवळपास अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी दिली होती.
शहरातील जैन इंटरनॅशनल, रेव्हरडेल स्कूल, स्टेपिंग स्टोन, केंद्रीय विद्यालय, नाथ व्हॅली, पोदार इंटरनॅशनल आणि पद्मश्री शंकरबापू आपेगावकर स्कूल या शाळांनी यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. दुपारी १२ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर होताच संबंधित शाळांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सर्वांनी एकाच वेळी इंटरनेटवर निकाल पाहण्याची घाई केली. त्यामुळे सातत्याने निकालाची वेबसाईट हँग होत होती. वेबसाईटवर निकाल पाहताच यशस्वी विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
रेव्हरडेलचा शंभर टक्के निकाल
रेव्हरडेल शाळेने यंदाही बारावी परीक्षेत निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली. या शाळेचे विद्यार्थी प्रीतम शिर्के आणि आदित्य सोनी यांनी ९३.४ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला. अभिनव बैद याने ९३.२ टक्के , सचित सहेगल याने ९२.६ टक्के आणि सुश्मिता देऊळगावकर हिने ९०.२० टक्के गुण मिळविले आहेत. या शाळेतील प्रीतम शिर्के, सचित सेहगल, सुश्मिता देऊळगावकर आणि अनुषा जेथवानी या विद्यार्थ्यांनी संगीत शास्त्रात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.
नाथ व्हॅली स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून सिरत निऱ्ह हिने ९६.२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. दाऊम जंग आणि आरुष बोहरा ९५.६ टक्के गुण घेतले असून, ते दोघेही द्वितीय आले आहेत.
विज्ञान शाखेतून अनंत काळे हा ९४.४ टक्के गुण घेऊन प्रथम आला. प्रभ्लीन बिंद्रा हिने ९४.२ टक्के गुण घेतले असून, ती द्वितीय, तर ९४ टक्के गुण घेऊन कोमल सोनवणे आणि जय थिरानी हे तृतीय आले आहेत.
अमृता छटवाल आणि सिरत निऱ्ह या दोघींनी इंग्रजी विषयात सर्वाधिक ९७ गुण, अर्थशास्त्र विषयात श्रेया ग्रामले आणि रिधिमा लहरिया या दोघींनी ९७ आणि आयुष बोहरा याने गणित विषयात ९६ गुण प्राप्त केले आहेत. प्राचार्य रंजित दास यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले आहे.