‘सेट’ परीक्षेचा निकाल तीन महिन्यांपासून रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:46 PM2019-09-10T12:46:58+5:302019-09-10T12:53:09+5:30
२३ जून रोजी घेण्यात आली परीक्षा
औरंगबाद : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या राज्य पात्र परीक्षेचा (सेट) निकाल मागील तीन महिन्यांपासून रखडला आहे. हा निकाल जाहीर करण्यात येत नसल्याची माहिती समोर आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २३ जून २०१९ रोजी प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली राज्य पात्रता परीक्षा (सेट) घेतली होती. या परीक्षेसाठी १ फेब्रुवारी रोजी अर्ज मागविण्यात आले होते. २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यात आले. त्यानंतर १३ जून रोजी हॉलतिकिट उपलब्ध करुन देण्यात आले. या प्रक्रियेनंतर २३ जून रोजी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर त्यामध्ये आवघ्या चार ते आठ दिवसात निकाल जाहीर करणे अपेक्षित असताना मागील तीन महिन्यांपासून परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत नाही. कोणत्या कारणामुळे निकाल राखडला आहे. याविषयीची माहिती पुणे विद्यापीठाने संकेतस्थळावरही जाहीर केलेली नाही. त्यामुळे निकालाविषयी उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे. तसेच हा निकाल तात्काळ लावण्याची मागणीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केली आहे. याविषयी पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाशी संपर्क साधला असता,प्रतिसाद मिळाला नाही.