अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे कामावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:35 AM2017-08-29T00:35:33+5:302017-08-29T00:35:33+5:30
येथील महसूल विभागातील अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होवू लागला आहे़ त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील महसूल विभागातील अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होवू लागला आहे़ त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे़
अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांची गेल्या आठवड्यात चंद्रपूर येथे तडकाफडकी बदली करण्यात आली़ बदलीचे कारण देण्यात आले नाही़ त्यांच्या जागी अन्य कोणाचीही नियुक्ती केलेली नाही़ त्यांचा पदभार निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे देण्यात आला आहे़ पिनाटे यांच्याकडे यापूर्वीच जिल्हा पुरवठा अधिकाºयांचा पदभार आहे़ परभणीच्या उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे यांच्याकडे सेलूच्या उपविभागीय अधिकºयांचा पदभार असून, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्याकडे पुनर्वसन उपजिल्हाधिकाºयांचा पदभार आहे़ रोहयो उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्याकडे निवडणूक उपजिल्हाधिकारी व भूसंपादन उपजिल्हाधिकाºयांचा पदभार आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक उपजिल्हाधिकाºयांकडे अतिरिक्त पदभार असल्याने याचा त्यांच्या मूळ कामावर व पदभार असलेल्या कामावर परिणाम होत आहे़ परिणामी विविध विकास कामांच्या फाईली प्रलंबित राहत आहेत़ अशात नांदेड मनपाच्या निवडणुकीसाठी जिल्हाकचेरीतील दोन उपजिल्हाधिकाºयांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे त्याचाही दैनंदिन कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे़