सिडको प्रकल्प रद्दचा फेरविचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:24 AM2020-12-17T04:24:43+5:302020-12-17T04:24:43+5:30
सिडकोच्या संचालक मंडळाच्यावतीने वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मार्च महिन्यात घेतला आहे. परिणामी परिसरातील विकास खुंटण्याची भितीही नागरिकातून ...
सिडकोच्या संचालक मंडळाच्यावतीने वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मार्च महिन्यात घेतला आहे. परिणामी परिसरातील विकास खुंटण्याची भितीही नागरिकातून वर्तविली जात आहे. सिडको वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने संचालक मंडळ व शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे. सिडको परिसरातील प्रलंबित व रखडलेली विकास कामे सुरु करुन प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे, नरेंद्र यादव, मच्छिंद्र कुंभार, चंद्रकांत चोरडिया, सुदाम जाधव आदींनी २१ डिसेंबरपासून सिडकोच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
निविदा मंजूर होताच विकासकामे
सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या की, प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कोविड व पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे विकास कामे थांबली होती. आता निविदा मंजूर होताच मेंटन्स व विविध विकास कामे सुरु केली जाणार आहेत.