निवृत्त सहायक फौजदाराला सायबर भामट्याचा १ लाख ९ हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:03 AM2021-06-09T04:03:26+5:302021-06-09T04:03:26+5:30

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अमरसिंग किशनसिंग चौधरी हे पोलीस दलातून दोन वर्षांपूर्वी सहायक फौजदार पदावरून निवृत्त झाले. बायपास ...

Retired Assistant Faujdar gets Rs 1 lakh 9 thousand from cyber villain | निवृत्त सहायक फौजदाराला सायबर भामट्याचा १ लाख ९ हजारांचा गंडा

निवृत्त सहायक फौजदाराला सायबर भामट्याचा १ लाख ९ हजारांचा गंडा

googlenewsNext

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अमरसिंग किशनसिंग चौधरी हे पोलीस दलातून दोन वर्षांपूर्वी सहायक फौजदार पदावरून निवृत्त झाले. बायपास परिसरातील मुस्तफाबाद येथील विनस -लोटस अपार्टमेंटमध्ये ते सहपरिवार राहतात. ४ मे रोजी सायंकाळी ते घरी असताना अनोळखी क्रमांकावरून त्यांना कॉल आला. त्या व्यक्तीने त्यांना तो भारतीय स्टेट बँकेचा अधिकारी असून बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडायचा असल्याने कॉल केल्याचे तो म्हणाला. तक्रारदार यांचा विश्वास बसावा याकरिता त्याने त्यांच्या बँक खात्याची माहिती तक्रारदार यांना दिली. तक्रारदारांनी विचारलेली सर्व माहिती त्याने सांगितली. ही माहिती मिळताच आरोपीने चौधरी यांच्या बँक खात्यातील पेन्शनचे १ लाख ८ हजार ९९८ रुपये परस्पर काढून घेतले. तक्रारदार यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता हा ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार असल्याचे बँकेतून सांगितले. याप्रकरणी चौधरी यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे तपास करीत आहेत.

Web Title: Retired Assistant Faujdar gets Rs 1 lakh 9 thousand from cyber villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.