मॉर्निंग वॉक करणा-या निवृत्त मुख्याध्यापकाला बसने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 07:17 PM2017-12-04T19:17:39+5:302017-12-04T19:18:12+5:30

औरंगाबाद: कामगारांना कंपनीत घेऊन जाणा-या भरधाव खासगी बसने मॉर्निंग वॉक करणा-या सेवानिवृत्त मुख्याध्यापकास चिरडले. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

A retired headmaster, who was walking a morning walk, was hit by the bus | मॉर्निंग वॉक करणा-या निवृत्त मुख्याध्यापकाला बसने चिरडले

मॉर्निंग वॉक करणा-या निवृत्त मुख्याध्यापकाला बसने चिरडले

googlenewsNext

औरंगाबाद: कामगारांना कंपनीत घेऊन जाणा-या भरधाव खासगी बसने मॉर्निंग वॉक करणा-या सेवानिवृत्त मुख्याध्यापकास चिरडले. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गारखेडा ते सुतगिरी चौक रोडवरील एका हॉटेलजवळ घडली.

पैली वरकी वारचाला (६८, रा.नाथप्रांगण, गारखेडा) असे मृताचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पैली वरकी वारचाला हे जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले आहेत. ते रोज सकाळी नियमित फिरायला जातात. नेहमीप्रमाणे आज सकाळी डोक्यावर मंकी टोपी आणि चष्मा लावून मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. कधी ते विभागीय क्रीडा संकुल येथे तर कधी रस्त्याने फिरत. आज सकाळी ते घरापासून निघाल्यानंतर  सूतगिरणी चौक मार्गे गारखेडा गावपर्यंत आले. यानंतर तेथून वळण घेऊन पुन्हा घराच्या दिशेने निघाले. यावेळी कामगारांना घेऊन जाणा-या भरधाव बसचालकाने त्यांना उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, ते उंच उडवून रस्त्यावर पडले आणि बसच्या चाकाखाली आले. या घटनेत ते घटनास्थळीच गतप्राण झाले.

अपघाताची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रस्त्यावर निपचित पडलेल्या पैली यांचा मृतदेह घाटीत दाखल केले. घटना पुंडलिकनगर ठाण्यांतर्गत येत असल्याने पोलिसांनी बस पुंडलिकनगर ठाण्यासमोर नेऊन उभी केली.  याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज म्हणाले की, आरोपी बसचालकाला आम्ही अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ राठोड करीत आहे.

Web Title: A retired headmaster, who was walking a morning walk, was hit by the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.