भाजपच्या उमेदवाराची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:44 AM2017-09-29T00:44:46+5:302017-09-29T00:44:46+5:30

महापालिका निवडणुकीत परिवर्तनाची हाक देणाºया भाजपाला संपूर्ण ८१ जागेवर उमेदवार मिळाले नाहीत. भाजपाचे मनपा निवडणुकीत ८० उमेदवार रिंगणात असून काँग्रेसकडेच संपूर्ण ८१ जागेवर उमेदवार आहेत.

The retreat of BJP candidate | भाजपच्या उमेदवाराची माघार

भाजपच्या उमेदवाराची माघार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका निवडणुकीत परिवर्तनाची हाक देणाºया भाजपाला संपूर्ण ८१ जागेवर उमेदवार मिळाले नाहीत. भाजपाचे मनपा निवडणुकीत ८० उमेदवार रिंगणात असून काँग्रेसकडेच संपूर्ण ८१ जागेवर उमेदवार आहेत.
निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी रिंगणातील उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यात पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना चिन्ह वाटप करण्यात आले. रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे ८१, भारतीय जनता पार्टीचे ८०, शिवसेना ६३, राष्ट्रवादी काँग्रेस ५५, एमआयएम ३२, बहुजन समाज पार्टी १७ आणि इतर राज्यस्तरीय, प्रादेशिक पक्ष तसेच अपक्ष मिळून २५३ उमेदवारांचा समावेश आहे.
मनपा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार देणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष ठरला आहे. भारतीय जनता पार्टीला एका ठिकाणी उमेदवार मिळाला नाही. प्रभाग १२ ड मध्ये भाजपाचा उमेदवार नाही. भाजपाने या ठिकाणी एका उमेदवारास बी फॉर्म दिल्यानंतरही त्या उमेदवाराने उमेदवारीच दाखल केली नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम, बसपा आदी पक्षांनाही सर्व जागी उमेदवार देता आले नाहीत. या सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.
निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवारांना दररोज खर्च दाखल करावा लागणार आहे. ट्रू वोटर अ‍ॅपद्वारेही तो सबमीट करायचा आहे. जे उमेदवार आपला रोजचा खर्च दाखल करणार नाहीत त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही आयुक्त गणेश देशमुख यांनी दिला आहे.
दरम्यान, मनपा निवडणुकीसाठी ५५० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आले आहेत. मनपा निवडणुकीत ३ लाख ९६ हजार ८७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी ३ हजार ६२७ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.राज्यात पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशिनचा वापर नांदेडमध्ये केला जाणार आहे. प्रभाग २ मधील संपूर्ण ३३ मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशिन बसवली जाणार आहे. या मशिनद्वारे मतदारांना आपण कुणाला मतदान केले हे व्हीव्हीपॅटद्वारे पाहता येणार आहे.

Web Title: The retreat of BJP candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.