भाजपच्या परतीचा प्रवास नांदेडातूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:45 AM2017-09-20T00:45:53+5:302017-09-20T00:45:53+5:30

भाजपा पक्ष हा मिसळ या खाद्यपदार्थासारखा झाला आहे़ कुणीही उठावे अन् भाजपात जावे, परंतु एवढे करुनही नांदेडात या पक्षाकडे चेहराच नसून भाजपाच्या परतीच्या प्रवासाचा प्रारंभ येथूनच होणार आहे, असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी व्यक्त केला़

The return journey of BJP came from Nanded | भाजपच्या परतीचा प्रवास नांदेडातूनच

भाजपच्या परतीचा प्रवास नांदेडातूनच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: भाजपा पक्ष हा मिसळ या खाद्यपदार्थासारखा झाला आहे़ कुणीही उठावे अन् भाजपात जावे, परंतु एवढे करुनही नांदेडात या पक्षाकडे चेहराच नसून भाजपाच्या परतीच्या प्रवासाचा प्रारंभ येथूनच होणार आहे, असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी व्यक्त केला़
अतिथी हॉटेलमध्ये आयोजित पत्रपरिषदेत वाघमारे म्हणाले, शहराचा कायापालट करणाºया चव्हाण घराण्याशी नांदेडकरांची नाळ जुळलेली आहे़ ही साथ कधी सुटणार नाही़ गेल्या ७० वर्षांत देशात काँग्रेसने विकासाचे, सकारात्मक राजकारण केले, परंतु तीन वर्षांतच भाजपाकडून स्वत:च्या फायद्यासाठी द्वेषाचे राजकारण केले जात आहे़ काँग्रेसने नांदेड शहरात राबविलेल्या जेएनएनयुआरएम योजनेला खीळ घालण्याचे काम भाजपाने केले आहे़ त्यामुळे अनेक विकासकामे बंद पडली आहेत़ काँग्रेसने नांदेडात केलेला विकास हा शाश्वत आहे़ कोणतीही विचारधारा नसलेल्या भाजपात ऊठसूठ कुणीही जात आहे, परंतु नांदेडात काँग्रेसप्रमाणे दूरदृष्टी असलेला एकही नेता भाजपाकडे नाही़ पुढील पंधरा वर्षे नांदेडात भाजपाला तसा नेताही मिळणार नाही़ भाजपाने कितीही भरणा केला तरी, काँग्रेसने केलेल्या विकासकामांसमोर तो शून्य आहे़
भाजपाची सत्ता असलेल्या महापालिका, नगरपरिषदांचा आढावा घेतल्यास भाजपाने निवडणूकवेळी केवळ खोटी स्वप्ने दाखविल्याचे ठळकपणे स्पष्ट होईल़ सेना नेते सध्या सरकारमध्ये राहायचे की नाही याच विषयावरुन गोंधळात आहेत़ ज्यांचे नेतृत्वच गोंधळलेले आहे, त्यांच्याबद्दल काय बोलायचे? राष्ट्रवादीसोबत आघाडीबाबत चर्चा सुरु आहे़ लवकरच तो विषयही मार्गी लावण्यात येईल असेही वाघमारे म्हणाले़ यावेळी आ़ डी़ पी़ सावंत, आ़अमरनाथ राजूरकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजीब यांची उपस्थिती होती़

Web Title: The return journey of BJP came from Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.