कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्या

By Admin | Published: May 4, 2017 11:33 PM2017-05-04T23:33:38+5:302017-05-04T23:41:44+5:30

लातूर : अहमदपूर तालुक्यातील धानोरा बु़ येथील शेतकऱ्यांनी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ मे पासून उपोषण सुरू केले आहे़

Return the lands taken for the factory | कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्या

कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्या

googlenewsNext

लातूर : अहमदपूर तालुक्यातील धानोरा बु़ येथील शेतकऱ्यांच्या २८ हेक्टर २३ आर जमीन जयश्री रोकडोबा साखर कारखान्यासाठी घेतली आहे़ ही जमीन परत मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ मे पासून उपोषण सुरू केले आहे़
धानोरा बु़ येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनी जयश्री रोकडोबा कारखाना प्रा़लि़ च्या नावे २००१ मध्ये नोंदणीकृत खरेदीखत करून घेतल्या़ त्यानंतर या जमिनी टष्ट्वेन्टीवन शुगर्स लिक़डे परस्पर हस्तांतरित करण्यात आल्या़ कारखाना उभा करण्याच्या वेळी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते़ एका वर्षात कारखान्याची उभारणी नाही झाल्यास त्या जमिनी परत देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते़ मात्र कारखाना उभारला नाही़ शिवाय, जमिनी परत मिळाल्या नाहीत,असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी म्हटले आहे़ आमच्या जमिनी कसून खाण्याची परवानगी द्यावी व त्या आमच्या नावे कराव्यात, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे़ उपोषणास पाच दिवस उलटले असून, अद्याप दखल घेतली नाही़

Web Title: Return the lands taken for the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.