परतीच्या पावसाचा सिल्लोडला तडाखा; वीज कोसळून एक शेतकरी जागीच ठार, चार जनावरेही दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 07:19 PM2021-10-08T19:19:01+5:302021-10-08T19:20:14+5:30

शेतकरी सोयाबीन काढण्यासाठी मुलासह गेला होता शेतात

The return rain hit Sillod; A farmer was killed on the spot and four animals were also death dut lightning | परतीच्या पावसाचा सिल्लोडला तडाखा; वीज कोसळून एक शेतकरी जागीच ठार, चार जनावरेही दगावली

परतीच्या पावसाचा सिल्लोडला तडाखा; वीज कोसळून एक शेतकरी जागीच ठार, चार जनावरेही दगावली

googlenewsNext
ठळक मुद्देसोयाबीन काढण्यास गेलेला शेतकरी वीज कोसळून ठार

सिल्लोड: तालुक्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी डखला येथे एक शेतकरी वीज पडून जागीच ठार झाला तर त्यांचा १६ वर्षीय मुलगा  गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सिल्लोड येथे रवाना करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील पांगरी, पानवडोद, उंडणगाव, पालोद या चार गावात चार जनावरे वीज पडून ठार झाली आहे. 

सिल्लोड तालुक्यातील डकला येथील शेतकरी मधुकर नाटूबा ननावरे ( ३५ ) त्यांचा मुलगा विशाल (१६ ) शेतात सोयाबीनची सोंगणी करण्यासाठी  गेले होते. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी दोघे सागवानच्या झाडाजवळ थांबले. मात्र, झाडावर अचानक वीज कोसळल्याने मधुकर ननावरे जागीच ठार झाले तर विशाल गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सिल्लोड येथे उपचार सुरु आहेत. मधुकर ननावरे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले; आधी पिके गेली आता वीज कोसळून १५ जनावरे दगावली

Web Title: The return rain hit Sillod; A farmer was killed on the spot and four animals were also death dut lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.