परतूरात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

By Admin | Published: November 10, 2014 11:37 PM2014-11-10T23:37:34+5:302014-11-10T23:51:09+5:30

परतूर : परतूर- आष्टी रोडवरील नियोजित रेल्वे उड्डाणपुलाच्या स्थलांतरासाठी मोंढा भागातील व्यापाऱ्यांनी सोमवारी कडकडीत बंद पाळला. परतूर आष्टी रोडवरील रेल्वे गेटवर उड्डाणपुलास मंजूरी मिळाली आहे

Returning the mercenaries' strike | परतूरात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

परतूरात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

googlenewsNext

 

परतूर : परतूर- आष्टी रोडवरील नियोजित रेल्वे उड्डाणपुलाच्या स्थलांतरासाठी मोंढा भागातील व्यापाऱ्यांनी सोमवारी कडकडीत बंद पाळला. परतूर आष्टी रोडवरील रेल्वे गेटवर उड्डाणपुलास मंजूरी मिळाली आहे. हा पुल करण्याच्या रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांकाम विभागाने जोरदार हालचाली चालवल्या आहेत, या ठिकाणच्या खडकाचे टेस्टींग घेवून संभाव्य नकाशेही तयार करून रेल्वे विभागास सादर करण्यात आले आहेत. मात्र या उड्डाणपुलामुळे शहरातील मोंढा भागातील बाजार पेठ नष्ट होऊन व्यापाऱ्यांचे मेठे नुकसान होणार असल्याची भीती व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. या नियोजीत उड्डाणपुलाचा मार्ग बदलण्यासाठी १० रोजी व्यापारी बंधूंनी मोंढा भागात कडकडीत बंद पाळला. आज व्यापाऱ्यांनी आपली सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून हा पुल इतरत्र हलवण्याची मागणी केली. आपल्या भावना कळवणारे निवेदन उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे यांना देण्यात आले, यावेळी शिवप्रसाद दरगड, सुनील मोर, रामू दरगड, सखाराम येवले, विलास पवार, रफिकभाई काचलीया, फारूकभाई काचलिया, दिलीप होलाणी, नितीन खरात, प्रविण कवले, सुनील कासट सह व्यापारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर) यांसंदर्भात माजी आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले की, हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण व्यापाऱ्यांसोबतच आहोत. पुल होणे आवश्यक आहे, मात्र कोणाचे नुकसान न होता तो मार्ग बदलून व्हावा असेही माजी आ. जेथलिया म्हणाले. ४यावेळी नगराध्यक्षा सुनंदा शहाणे म्हणाल्या, की, आपण व्यापाऱ्यांचे हित पाहणार जोपर्यंत उड्डाणपुलाचा मार्ग बदणार नाहीत तोपर्यंत आम्ही नाहरकत प्रमाणपत्र देणार नसल्याचेही नगराध्यक्षा शहाणे म्हणाल्या.

Web Title: Returning the mercenaries' strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.