गंगाखेडमध्ये महसूल, पोलीस प्रशासनातील वाद विकोपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:57 AM2017-09-11T00:57:36+5:302017-09-11T00:57:36+5:30
दत्तमंदिर चौक परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकातील तलाठी शिवाजी मुरकुटे व पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्यात वाद झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस व महसूल प्रशासनातून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने वाद विकोपाला गेल्याचे ेदिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड: दत्तमंदिर चौक परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकातील तलाठी शिवाजी मुरकुटे व पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्यात वाद झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस व महसूल प्रशासनातून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने वाद विकोपाला गेल्याचे ेदिसत आहे.
गंगाखेड शहरातील दत्तमंदिर परिसरात मुंजाजी नागरगोजे यांच्या खाजगी गोदामासमोर ८ सप्टेंबर रोजी पोलीस पथकाने छापा टाकून काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला होता. या घटनेचा पंचनामा सुरु असताना महसूल पथकातील तलाठी शिवाजी मुरकुटे व पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्यात वाद झाला. पोलीस निरीक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप तलाठी मुरकुटे यांनी केला. तर दुसीरकडे ६ सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी काढलेल्या आदेशानुसार तलाठी मुरकुटे हे पथकात नियुक्तीवर नसल्याचे समोर आले आहे, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. तलाठी मुरकुटे खाजगी वाहनातून मुलांसोबत धान्य पकडलेल्या ठिकाणी कशासाठी आले, असा प्रश्न पोलिसांनी उभा केला. त्यामुळे दोन्ही विभागात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे.