पंचनामे दौऱ्यातच महसूलचे वाहन खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:04 AM2021-09-19T04:04:37+5:302021-09-19T04:04:37+5:30

सोयगाव : अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाने हाती घेतलेले असताना शनिवारी तहसीलदार रमेश जसवंत प्रत्यक्ष पंचनाम्यासाठी दौऱ्यावर असताना अचानक ...

Revenue vehicle damaged during Panchnama tour | पंचनामे दौऱ्यातच महसूलचे वाहन खराब

पंचनामे दौऱ्यातच महसूलचे वाहन खराब

googlenewsNext

सोयगाव : अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाने हाती घेतलेले असताना शनिवारी तहसीलदार रमेश जसवंत प्रत्यक्ष पंचनाम्यासाठी दौऱ्यावर असताना अचानक शासकीय वाहन नादुरुस्त झाले. त्यामुळे तहसीलदार रमेश जसवंत यांना काही अंतर पायी प्रवास करावा लागला. पंचनाम्याच्या दौऱ्यातच हा प्रकार घडल्याने तहसीलदारांची चांगलीच पंचाईत झाली.

सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग आला आहे. त्यासाठी तहसीलदार रमेश जसवंत यांसह अधिकारी, कर्मचारी थेट शेतशिवारात फिरत आहेत. मात्र, शनिवारी त्यांच्या दौऱ्यात अचानक शासकीय वाहनच खराब झाले. पंचनामे प्रक्रिया अर्धवट न सोडता तहसीलदारांनी वाहन थेट सोयगावला पाठवून काही अंतर पायी प्रवास केला. तर त्यानंतर पर्यायी वाहनाने दुसऱ्या क्षेत्रात पंचनामे करण्यासाठी गेले. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतेच नवीन वाहन खरेदी करून जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना पुरविले. त्यात सोयगाव तहसील कार्यालयालाही नवीन वाहन मिळाले होते. परंतु, सहाच महिन्यांत ही कार ना दुरुस्त झाल्याने महसूल प्रशासनाला ऐन टंचाई काळात अडचण निर्माण झाली होती.

180921\img-20210918-wa0105.jpg

सोयगाव-पंचनामे दौऱ्यात खराब झालेले वाहन

Web Title: Revenue vehicle damaged during Panchnama tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.