लालफितीत अडकली रामनगरची महसूल गाव नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:05 AM2021-07-26T04:05:02+5:302021-07-26T04:05:02+5:30
अंजना-पळशी मध्यम प्रकल्पाच्या निर्मितीसाठी वाडी व पळशी (बु.) या दोन गावांतील जमीन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी पुनर्वसित झालेल्या ...
अंजना-पळशी मध्यम प्रकल्पाच्या निर्मितीसाठी वाडी व पळशी (बु.) या दोन गावांतील जमीन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी पुनर्वसित झालेल्या वाडी या गावाचे नाव रामनगर करण्यात आले. रामनगर ही स्वतंत्र ग्रामपंचायतदेखील निर्माण झाली. मात्र, महसुली क्षेत्र पळशी बु. असल्याने नागरिकांच्या सातबाऱ्यावर रामनगरचा उल्लेख न होता पळशी (बु.) असा होतो. त्यामुळे रामनगरचे महसूल क्षेत्रात रूपांतर केले जावे, अशी मागणी केली जात आहे. रामनगरचे कार्यक्षेत्र गट क्र. १ ते २६० ठरले आहे; परंतु संबंधित कार्यालयाकडून अद्यापही रामनगरची महसुली गाव म्हणून नोंद केली नाही.
कोट
संबंधित कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला; पण अद्यापही प्रकरण जसेच्या तसेच आहे. ७/१२ उताऱ्यावर रामनगरची नोंदच होत नाही. तरी संबंधित विभागाने गांभीर्याने ही अडचण लक्षात घेत समस्या सोडवावी, अशी मागणी आहे.
- रामभाऊ साळुंके, उपसरपंच