महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By Admin | Published: March 11, 2017 12:23 AM2017-03-11T00:23:01+5:302017-03-11T00:24:05+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन करून प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदविला.

Revenue workers' work stop movement | महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

googlenewsNext

उस्मानाबाद : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी गजानन चौधरी यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूस औरंगाबादचे जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत, जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन करून प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदविला.
चौधरी यांच्या मृत्यूच्या तीन दिवस अगोदरच विभागातील अडचणी व त्यांच्या मानसिकतेविषयी महसूल कर्मचारी संघटनेने निवेदन देऊन त्यांच्या समस्याचे निराकरण करण्यास सुचविले होते. मात्र प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्याने चौधरी यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची संघटनेने निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सी. व्ही. शिंदे, सचिन पाटील, एस. व्ही. साबणे, पंकज कुलकर्णी, प्रसाद साळुंके, सी. एस. कदम, के. एस. गायकवाड, जी. पी. गपाट, डी. ए. पवार, आर. एस. इबत्ते, एस. आर टिके, जी. बी. हाके, एस. बी. मुळे आदींच्या सह्या आहेत. औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध म्हणून सर्व तहसील तसेच उपविभागीय व जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज शुक्रवारी बंद ठेवण्यात आले होते. सलग तीन सुट्या आल्याने कामाचा निपटारा शुक्रवारी करावा यासाठी आलेल्या नागरिकांना मात्र यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले.

Web Title: Revenue workers' work stop movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.