औरंगाबादेत आंदोलनामुळे आढावा बैैठकीचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:22 AM2018-06-09T00:22:57+5:302018-06-09T00:24:13+5:30
बी. टी. बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल करून शेतकºयांना द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी शेतक-यांनी प्रतीकात्मक फाशी आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बी. टी. बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल करून शेतकºयांना द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी शेतक-यांनी प्रतीकात्मक फाशी आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केल्याने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीचा फज्जा उडाला.
फलोत्पादन संचालक पी. एन. पोकळे यांनी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील कृषी विभागातील विविध योजनांची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक बोलावली होती. शहानूरमियाँ दर्गा परिसरातील जिल्हा अधीक्षक, कृषी कार्यालयातील सभागृहात सकाळी ११.३० वाजता बैठकीला सुरुवात झाली. दुपारी १२.३० वाजेदरम्यान जि.प.चे माजी सभापती संतोष जाधव पाटील आपल्या शेतकरी सहकाºयांसह बैठकीच्या ठिकाणी आले व त्यांनी सरकारचा निषेध केला. यात गंगापूर तालुक्यातील संजय चव्हाण व खुलताबाद तालुक्यातील यसगाव येथील अरुण खंडागळे या दोन शेतकºयांनी प्रतीकात्मक फाशी घेतल्याने बैठकीत गोंधळ उडाला. बी. टी. कापूस नुकसानभरपाईसाठी १,८५,४०७ शेतकºयांनी ‘जी’ व ‘एच’ अर्ज भरले. त्यापैकी ९६ हजार शेतकºयांचे अर्ज पुणे येथील कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आले, अशी माहिती यावेळी संबंधित अधिकाºयांनी दिली. उर्वरित ८९,४०७ शेतकºयांचे अर्ज का पाठविले नाही, असा जवाब संतोष जाधव पाटील यांनी विचारला. त्यावेळी अधिकाºयांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी नुकसानभरपाईचे अर्ज कृषी आयुक्तालयाकडे न पाठविणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी. तसेच बोगस बियाणे प्रमाणित करणाºया अधिकाºयांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी लावून धरली. सर्व अर्ज येत्या चार दिवसांत कृषी आयुक्तांकडे पाठविले जातील, असे लेखी आश्वासन पी. एन. पोळके यांनी दिले. यानंतर चार तासांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन शेतकºयांनी मागे घेतले. यावेळी कृषी विभागातील अधिकारी वर्ग हजर होता. आंदोलनामुळे आढावा बैठक गुंडाळावी लागली.