लॉकडाऊनच्या अनुषंगाने गंगापुरात आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:04 AM2021-03-31T04:04:36+5:302021-03-31T04:04:36+5:30

डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कर्मचारी व शासकीय अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख पार पाडल्यानेच आपण कोविडची पहिली लाट थोपवू शकलो, त्याच ...

Review meeting in Gangapur in connection with the lockdown | लॉकडाऊनच्या अनुषंगाने गंगापुरात आढावा बैठक

लॉकडाऊनच्या अनुषंगाने गंगापुरात आढावा बैठक

googlenewsNext

डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कर्मचारी व शासकीय अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख पार पाडल्यानेच आपण कोविडची पहिली लाट थोपवू शकलो, त्याच धरतीवर पुन्हा एकदा सजग होऊन सर्वांनी आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने नेमून दिलेल्या जागेवर हजर राहून गावपातळीवर कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, लसीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांना तयार करणे, मास्क वापरण्याचे व सामाजिक अंतर बाळगण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देणे गरजेचे आहे, असे मत आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश माणिक आहेर यांनी दिले. या बैठकीला नोडल अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार अविनाश शिंगोटे, पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड, मुख्याधिकारी संतोष आगळे, गटविकास अधिकारी विजय परदेशी, नगरसेवक प्रदीप पाटील, भाग्येश गंगावल, अविनाश पाटील, मारोती खैरे, रामेश्वर मुंदडा, रुग्ण कल्याण समितीचे अतुल रासकर, प्रशांत मुळे, डॉ. सुदाम लगास, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, डॉक्टरांची उपस्थिती होती.

Web Title: Review meeting in Gangapur in connection with the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.