अकरावी प्रवेशाचे विशेष फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:02 AM2020-12-25T04:02:56+5:302020-12-25T04:02:56+5:30

अकरावी प्रवेशासाठी २६ डिसेंबरला एसईबीसी विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) किंवा सर्वसाधारण प्रवर्ग निवडणे, अंडरटेकिंग अपलोड करुन अर्ज ...

Revised schedule of special round of eleventh admission announced | अकरावी प्रवेशाचे विशेष फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

अकरावी प्रवेशाचे विशेष फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

googlenewsNext

अकरावी प्रवेशासाठी २६ डिसेंबरला एसईबीसी विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) किंवा सर्वसाधारण प्रवर्ग निवडणे, अंडरटेकिंग अपलोड करुन अर्ज भरुन अपलोड करुन पडताळणी करुन घेणे, या काळात इतर विद्यार्थ्यांना आपला अर्जाच्या भाग एक मध्ये बदल करता येईल. तर २७ डिसेंबरला प्रवेशासाठी अर्जाच्या भाग दोनमध्ये पसंतीक्रम नोंदवणे, लॉक करणे आणि यापूर्वी ऑप्शन फाॅर्म भरल्यास त्यात बदल करता येईल. २८ डिसेंबरला गुणवत्ता यादी जाहीर होईल. २९ ते ३१ डिसेंंबर दरम्यान विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. तीनही कोट्यातून प्रवेश सुरु राहतील. तर १ जानेवारीला विशेष फेरी पूर्ण झाल्यावर रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. असे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे. शहरात अकरावी प्रवेशासाठी एकूण २६ हजार ९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर २० हजार ९६१ जणांनी ऑनलाईन अर्ज लॉक केले तर २० हजार ८५७ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यात आली आहे.

Web Title: Revised schedule of special round of eleventh admission announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.