पाहणी दौºयात आश्वासनांची उजळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:30 AM2017-11-16T00:30:32+5:302017-11-16T00:31:03+5:30

येथील रेल्वे स्थानकावरील रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांनी बुधवारी परभणी दौºयात मागील आश्वासनांचाच पुनरुच्चार केला़ १५ डिसेंबरपर्यंत परभणी स्थानकावरील एक्सलेटर आणि लिफ्टचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याने आता प्रवाशांना १५ डिसेंबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे़

Revision of Assurances in the survey tour | पाहणी दौºयात आश्वासनांची उजळणी

पाहणी दौºयात आश्वासनांची उजळणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील रेल्वे स्थानकावरील रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांनी बुधवारी परभणी दौºयात मागील आश्वासनांचाच पुनरुच्चार केला़ १५ डिसेंबरपर्यंत परभणी स्थानकावरील एक्सलेटर आणि लिफ्टचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याने आता प्रवाशांना १५ डिसेंबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे़
परभणी रेल्वे स्थानकावर अनेक असुविधा आहेत़ अरुंद दादरा, सरकता जिना (एक्सलेटर), लिफ्ट हे प्रश्न मागील वर्षभरापासून रखडले आहेत़ मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ वेळोवेळी या प्रश्नांविषयी पाठपुरावा करीत आहे़ बुधवारी नांदेड विभागाचे रेल्वे व्यवस्थापक डॉ़ अखिलेश सिन्हा यांनी स्वतंत्र रेल्वेने नांदेड-परळी मार्गावरील रेल्वे स्थानकांची तपासणी केली़ सकाळी १० वाजेच्या सुमारास डॉ़ सिन्हा परभणीत पोहचले़ संपूर्ण स्थानकाची पाहणी केल्यानंतर त्यांनी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा केली़ यावेळी स्थानकावरील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या़ त्या यापूर्वीही अनेक वेळा मांडल्या होत्या़ त्यामुळे या वेळच्या दौºयात रेल्वे प्रबंधकांनी मागील दौºयात दिलेली आश्वासनेच यावेळीही दिली़ परभणी रेल्वे स्थानकावर १५ डिसेंबरपूर्वी लिफ्ट आणि सरकता जिना बसविला जाईल, असे त्यांनी सांगितले़
पोखर्णी रेल्वे स्थानकावर वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता या स्थानकावर रेल्वेचे थांबे बंद केले जातील, रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडून गेले आहे़ या वेळापत्रकात सुसूत्रता आणण्यासाठी या मार्गावरून धावणाºया रेल्वेचा वेग ५० किमी प्रतितासावरून ८० किमी प्रतीतास केला जाईल़ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कोच लोकेटर बसविण्यासाठी निविदा मागविल्या असून, प्रक्रियेअंती हे काम पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले़
यावेळी रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते़ रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, सुरेश नाईकवाडे, रितेश जैन आदींनी त्यांच्याशी चर्चा केली़

Web Title: Revision of Assurances in the survey tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.