रिक्षाने उडविले दुचाकीस्वारांना; एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:04 AM2021-07-27T04:04:16+5:302021-07-27T04:04:16+5:30
वैजापूर : भरधाव वेगात असलेल्या मालवाहू रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार व अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ...
वैजापूर : भरधाव वेगात असलेल्या मालवाहू रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार व अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील जांबरगाव शिवारात घडली. सुनील नानासाहेब चौभे (३२, रा. हनुमंतगाव) असे मयताचे नाव आहे, तर सुभाष उर्फ लाला बाळासाहेब फुलारे (२७) हा जखमी झाला आहे.
सुनील व सुभाष हे दोघे वैजापूर शहरात वेल्डींगचे काम करतात. रविवारी काम आटोपल्यानंतर ते एकाच दुचाकीवरून गंगापूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, जांबरगावाजवळ समोरून येणाऱ्या मालवाहक रिक्षाने (क्र. एमएच २० ईएल ६८०८) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात सुनील चौभे यांच्या डोक्याला मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर अन्य दुचाकीस्वार सुभाष फुलारेला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. या अपघाताबद्दल चिंचडगाव येथील दादासाहेब पवार यांनी मयत सुनील चोभे यांचे चुलते बाबूराव चोभे यांना फोनवरून माहिती दिली. ते तात्काळ गावातील दोन जणांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी अपघातातील दोघे रस्त्यावर पडलेले होते. दरम्यान पोलीसही घटनास्थळी पोहचले होते. रुग्णवाहिकेतून दोघांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जखमी झालेल्या सुभाषला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी बाबूराव चोभे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालवाहू रिक्षा चालकाविरोधाच वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सी. एम. चरभरे हे करित आहेत.
-----
चौकट
सुनील व सुभाष हे दोघेही चांगले मित्र होते. वैजापूर शहरात त्यांचे वेल्डिंगचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते काम आटोपून गावाकडे निघाले. मात्र, भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू रिक्षाने त्यांच्यावर घाला घातला. सुनील गेला तर सुभाषची प्रकृती देखील गंभीर असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे. मयत सुनीलच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सुनील