जालना रोडवर गुन्हेशाखेने गांजा घेऊन जाणारा रिक्षा पकडला; दोन अटक एक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 07:25 PM2018-11-13T19:25:01+5:302018-11-13T19:25:35+5:30
एका रिक्षासह दोघांना जालना रोडवर छापा मारून गुन्हेशाखेने अटक केली आहे. त्यातील एक आरोपी पसार झाला आहे.
औरंगाबाद: शहरात दारू तसेच गांजाची विक्री छुप्या मार्गाने सुरू असून, दिवाळीच्या दरम्यान फक्त पोलिसांनी दारू अड्यावर छापे मारले होते. आज गांजा घेऊन जाणाऱ्या एका रिक्षासह दोघांना जालना रोडवर छापा मारून गुन्हेशाखेने अटक केली आहे. त्यातील एक आरोपी पसार झाला आहे.
गुन्हेशाखेला खात्रीलायक खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आॅटो रिक्षा (क्र. एमएच २० ईएफ ४४५९) गांजाची तस्करीकरीत असून, त्याच्यावर पाळत ठेवली सेव्हन हिल परिसरात एका दुकानासमोर ही रिक्षा उभी होती. याचवेळी गुन्हशाखेने छापा मारला असता जाकेर खान महेबुब खान (२९, रा. सेंट्रल बसस्थानक),समीर सिंकदर खान (रा. आसेफिया कॉलनी, रिक्षा चालक कबीर बेग उर्फ सलमान लाला बेग (२५, रा. आसेफिया कॉलनी) यांना पकडले परंतु त्यांच्या ताब्यातून समीर खान सिंकदर खान पोलिसांना झटका देऊन पसार झाला. रिक्षात १६ किलो १६८ ग्रॅम गांजा आढळून आला. रिक्षासह गांजा जालनारोडवर गुन्हेशाखेच्या पथकाने जप्त केला आहे.
गांजा तस्कारीवर छापा...
गुन्हेशाखेच्या पथकात प्रभारी पोलीस निरीक्षक एस. ए. उदार, सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, फौजदार हेमंत तोडकर, पोहेकॉ भाऊराव राठोड, संतोष सोनवणे, नवाब शेख, विरेश बने, लालाखा पठाण, नंदलाल चव्हाण, रितेश जाधव, सय्यद अशरफ, विनोद गिरी, आयझेक कांबळे यांच्या पथकाने ही गांजाची तस्करी करणाऱ्या रिक्षा व दोघांना अटक केली आहे.
तडीपार असूनही शहरात
जाकेर हा सराईत गुन्हेगार असून, तो गतवर्षी दोन वर्षाकरीता शहर व जिल्ह्यातून तडीपार असून देखील शहरात येऊन गुन्हेगारी कारवाई करीत असताना मिळून आला. पळून गेलेला समीरखान याच्यावर एमपीडीएस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी जवाहरनगर पोलीस जाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.