रिक्षाचालकांची ईद सरकारच्या मदतीविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:04 AM2021-05-14T04:04:01+5:302021-05-14T04:04:01+5:30
औरंगाबाद : रिक्षाचालक अद्यापही वाऱ्यावरच असून, शासन स्तरावर जैसे थे परिस्थिती दिसून येत आहे. युनियनमार्फत सर्व रिक्षाचालकांना बॅंक खाते ...
औरंगाबाद : रिक्षाचालक अद्यापही वाऱ्यावरच असून, शासन स्तरावर जैसे थे परिस्थिती दिसून येत आहे.
युनियनमार्फत सर्व रिक्षाचालकांना बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक लिंक करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, हे करण्यासाठी काही अडचण असल्यास लाल बावटा रिक्षाचालक युनियन, खोकडपुरा कार्यालयात संपर्क करण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.
रिक्षाचालकांची ईदही सरकारच्या मदतीशिवाय जाणार असेच दिसत आहे. केरळ सरकारने जोपर्यंत लाॅकडाऊन तोपर्यंत अन्न, पाणी, वीज मोफत, ओरिसा सरकारने तीन हजार रुपये, तमिळनाडू सरकारने प्रत्येकी चार हजार रुपये मदत दिली. केंद्र सरकारने काहीच दिले नाही आणि महाराष्ट्र सरकारने अत्यल्प, तेही काही लोकांना आणि तेही खूपच उशिरा दिले. सलून कामगार, हाॅटेल कामगार, दुकानातील कामगार, छोटे व्यावसायिक आदींना कोणतीही मदत देण्याची इच्छा सरकारची नाही, याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.