रिव्हरडेलचा विद्यार्थी यश कुलकर्णी अव्वल
By Admin | Published: May 20, 2014 01:29 AM2014-05-20T01:29:30+5:302014-05-20T01:34:42+5:30
औरंगाबाद : दहावी वर्गाचा सीबीएसई अभ्यासक्रमाचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर झाला असून, शहरातील शाळांनी या परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.
औरंगाबाद : दहावी वर्गाचा सीबीएसई अभ्यासक्रमाचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर झाला असून, शहरातील शाळांनी या परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. नाथ व्हॅली स्कूल नाथ व्हॅलीचा निकाल १०० टक्के लागला. त्यात सीजीपीए १० गुणांकन प्राप्त करणारे ३४ विद्यार्थी आहेत. ४० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले. ४३ विद्यार्थी ८० ते ८९ टक्के, १४ विद्यार्थी ७० ते ७९ टक्के , ११ विद्यार्थी ६० ते ६९ टक्के आणि केवळ २ विद्यार्थ्यांनी ५० ते ५९ टक्के गुण पटकावले आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी - प्रसाद पटारे (९७.२ टक्के), अनंत काळे (९७ टक्के), सुशांत राठी (९७ टक्के), उमंग चौच्चारिया (९६.६), साई वारे (९६.६), सनी अग्रवाल (९६.४), ओंकार देशमुख (९६.४), सिद्धांत संजय लड्डा (९६.२), कोमल सोनवणे (९४.८), दर्पण ठोले (९४.४), शिवाजी गणेश घुगे (९४.२), जय थिराणी (९४.२), आदित्य वाडी (९४.२), डाऊम जुंग (९४), आयुष अग्रवाल (९३.८), अमोघ सचिन भागवत (९३.८), रिद्धीमा लहारिया (९३.८), अथर्व जयंत सराफ (९३.६), सिद्धांत नवीन सिंघवी (९३.६), यश संजय अनारसे (९३.४), शुभम् किरण वाणी (९३.४), सिरथ निºह (९३.२), गार्गी देशमुख (९३), शिवाणी राजेंद्र देशमुख (९२.६), अवणी प्रवीण काबरा (९२.६), प्रियाल संजय कासलीवाल (९२.६), जयाती राजेंद्र बेदमुथा (९२.४), निहाली कुलकर्णी (९२.४), रिया सुनील भूमकर (९२.२), आदित्य संजीव पडवळ (९२), मल्हार भोसले (९१.६), रश्मी वर्मा (९१.६), अम्रीता चटवाल (९१.४), मधुरा रवींद्र काटे (९१.४), निलाद्री बिस्वास (९१.२), संकेत पिडाडी (९१.२) औरंगाबाद : सोहम देशमुख (९१), शुभंकर कुलकर्णी (९१), श्वेता जाधव (९०.४), आदित्य नवगिरे (९०.४) रिव्हरडेल हायस्कूल मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या सीबीएसई बोर्डाच्या निकालात रिव्हरडेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. प्रवीण कुलकर्णीने विज्ञान विषयात १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत. स्टेपिंग स्टोनचे धवल यश स्टेपिंग स्टोन शाळेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेला बसलेल्या ११९ विद्यार्थ्यांपैकी ५५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आणि १०३ विद्यार्थी विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाले. ११ विद्यार्थ्यांनी गणितात, विज्ञान विषयात ८ विद्यार्थी व एसएसटीमध्ये ८ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले. सौरभ वरड, केतन घर्टे, श्रुती पाटील, रोहन साकेरी, सई किटकरू, अमय जैन, साहिलसिंग राजपूत, यश कुलकर्णी, शिवाणी जाधव, प्रवीण खंडेलवाल, वेदश्री पैठणकर या विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले. शाळेतर्फे यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले. टेंडर केअरचे यश टेंडर केअर शाळेने निकालात घवघवीत यश पटकावले. शाळेच्या ५८ विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थ्यांनी ए ग्रेड पटकावला. त्यात श्रावणी घाणेकर (९८.२ टक्के), कौशलराज दांडेगावकर (९६.८), वरद कल्याणकर (९६.२), वर्षित दुबे (९५.८), आदर्श पटेल (९५.४), ओमकार आवले (९४.८), श्रद्धा बांगड (९४.४), ऋतुजा धर्माधिकारी (९४.२), मोहित काळे (९४) यांचा समावेश आहे. ‘यश’चे यश रिव्हरडेल हायस्कूलचा विद्यार्थी यश कुलकर्णी याने ९९.२ टक्के गुण प्राप्त केले असून, तो देशात अव्वल आल्याचे शाळेने कळविले आहे. इयत्ता दहावीच्या निकालात सतत पाचव्या वर्षी शाळेने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. यश कुलकर्णी याने देशात प्रथम येताना आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचा दावा शाळेने केला. शाळेचे राघवेंद्र जोशी यांनी कळविले की यशने गणित, विज्ञान आणि संस्कृत विषयात १०० टक्के, इंग्रजीत ९९ आणि सामाजिक विज्ञानात ९७ टक्के गुण पटकावले आहेत.