औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धीने मुंबईत उमटवला ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:48 PM2018-01-28T23:48:07+5:302018-01-28T23:48:42+5:30

गत केल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय व राज्य पातळीवर पदकांची लूट करणाºया औरंगाबादच्या प्रतिभावान जिम्नॅस्ट रिद्धी आणि सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी मुंबई येथील राज्य आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवला. या स्पर्धेत रिद्धीने तीन रौप्य, तर सिद्धीने दोन कास्यपदकांची लूट केली. या चमकदार कामगिरीमुळे या दोन्ही बहिणींनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातील आपले स्थान निश्चित केले.

Riddhi from Aurangabad, Siddhi came out in Mumbai | औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धीने मुंबईत उमटवला ठसा

औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धीने मुंबईत उमटवला ठसा

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धा : एकूण पाच पदकांची केली लूट

औरंगाबाद : गत केल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय व राज्य पातळीवर पदकांची लूट करणाºया औरंगाबादच्या प्रतिभावान जिम्नॅस्ट रिद्धी आणि सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी मुंबई येथील राज्य आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवला. या स्पर्धेत रिद्धीने तीन रौप्य, तर सिद्धीने दोन कास्यपदकांची लूट केली. या चमकदार कामगिरीमुळे या दोन्ही बहिणींनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातील आपले स्थान निश्चित केले.
सिद्धीने एकूण ३६.४५ गुण नोंदवले. तिने टेबल वॉल्ट या वैयक्तिक प्रकारात ११.१७५ गुण, फ्लोअर एक्झरसाईजमध्ये ९.८५ गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. त्याचप्रमाणे सर्वोत्तम जिम्नॅस्टिक स्पर्धा प्र्रकारातही तिने उपविजेतेपद पटकावले. तिची बहीण रिद्धीनेदेखील तिच्या पावलावर पाऊल ठेवताना फ्लोअर एक्झरसाईजमध्ये वैयक्तिक कास्यपदक जिंकले. दुसरे कास्यपदक तिला सर्वोत्तम जिम्नॅस्टिक स्पर्धा प्रकारात मिळाले. या दोघींनाही रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत औरंगाबादच्या मुलांच्या संघाने जबरदस्त कामगिरी करताना सांघिक रौप्यपदक जिंकले. या संघात करण खारटमोल, आशिष शिंदे, व्यंकटेश अलकुंठे, आदित्य खोबे यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल सिद्धी व रिद्धी प्रवीण हत्तेकर आणि रौप्यपदक जिंकणाºया औरंगाबादच्या मुलांच्या संघाचे साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, प्रशिक्षक अजितसिंग राठोड, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे, पिंकी देब, राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी, प्रशिक्षक तनुजा गाढवे, रणजित पवार, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. संकर्षण जोशी, सचिव सागर कुलकर्णी, डॉ. विशाल देशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, मुख्याध्यापिका सुरेखा देव आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
दोघींचीही खेलो इंडियासाठी निवड
मुंबईत जबरदस्त कामगिरी करीत एकूण ५ पदकांची लूट करणाºया रिद्धी आणि सिद्धी हत्तेकर यांची दिल्लीत होणाºया 'खेलो इंडिया' जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान खेळवली जाणार आहे. पुण्यात या स्पर्धेसाठी सुरू असलेल्या सराव शिबिरात त्या सराव करीत आहेत.

Web Title: Riddhi from Aurangabad, Siddhi came out in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.